वाई : ‘मानवी हस्तक्षेपाचा अतिरेक झाल्याने पर्यावरणाचे अपरिमित नुकसान झाले आहे. याचे अनेक दुष्परिणाम दिसत आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण गरजेचे आहे. तसेच कोरोनाच्या संकटात व नियमित रक्ताची मोठी गरज असते, रक्तदान केल्याने अनेकांना जीवदान मिळत असते. त्यामुळे रक्तदान करणे काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन रोटरी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक बागडे यांनी केले.
सोनजाई डोंगरात आयोजित वृक्षारोपणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जांभूळ, लिंब, सीताफळ, आवळा आदी पन्नास रोपांचे रोपण करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लबच्या सचिव डॉ. प्रेरणा ढोबळे म्हणाल्या, ‘भरमसाठ वृक्षतोडमुळे पर्यावरणाचे संतुलित चक्र तुटले आहे. ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या वृक्षांचे महत्व कोरोना काळात माणसाला कळले आहे. वृक्षारोपणाबरोबर संरक्षण व्हावे म्हणून त्यांची निगाही राखली जात आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करून वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण केलेल्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी रोटरी क्लबने घेतली आहे. वाई येथील ममता हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ३६ जणांनी रक्तदान केले. यावेळी स्वाती हेरकळ, डॉ. शंतनु अभ्यंकर, अजित क्षीरसागर, प्रमोद शिंदे, सुनील शिंदे, डॉ. जितेंद्र पाठक, अनुपम गांधी, कुणाल शहा, नीला कुलकर्णी, मदन पोरे, पूरब शहा, संजीवनी कद्दू, डॉ. रूपाली अभ्यंकर, प्रशांत इनामदार, संतोष निकम, प्रमोद चव्हाण, संजीवनी वरखडे, अश्विनी बागडे उपस्थित होते.