शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
2
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
3
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
4
"घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गंमतीदार किस्सा
5
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
6
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
7
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
8
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
9
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
10
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
11
इटलीच्या PM मेलोनी यांना डेट करताहेत इलॉन मस्क? चर्चांना उधाण, स्पष्टीकरण देत म्हणाले...  
12
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
13
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
14
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
15
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
17
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
18
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
19
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
20
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स

Maharashtra Political Crisis: आईला सोडून मावशीकडे धावा.. हिंदुत्वाचा गनिमी कावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 6:13 PM

मतदारसंघात विकासकामे होत नव्हती, आम्हाला निधी मिळत नव्हता, आमच्याकडे पाच पाच मंत्रिपदे होती, पण फक्त नावालाच होती, अशी हतबलता व्यक्त करणारे मंत्री गेल्या अडीच वर्षांत मग राजीनामा देऊन का रिकामे झाले नाहीत.

दीपक शिंदेमाय मरो आणि मावशी जगो... अशी आपल्याकडे पुरातन म्हण आहे. आई जेवढी काळजी घेते त्याच्यापेक्षा अधिक काळजी मावशी घेते. त्यामुळे एखाद्या संकटात आईची साथ सुटली तरी मावशीचा आधार मोलाचा ठरत असतो. अशीच काहीशी अवस्था बंडखोर शिवसैनिकांची झाली आहे. मातृसंस्था असलेल्या शिवसेनेला सोडून भाजपच्या जवळ गेलेल्या या शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी घेतलेली ही भूमिका कोणालाच पटलेली नाही. आई सोबत असताना मावशीशी जवळीक करणाऱ्या या नेत्यांनी पूतनामावशीशी तर जवळीक केली नाही ना, अशी शंकादेखील व्यक्त केली जात आहे. हिंदुत्वाचा विषय म्हणून बाजूला जाणाऱ्या नेत्यांनी आत्तापर्यंत हिंदुत्वासाठी काय केले. महेश शिंदे आणि शंभूराज देसाई यांनी तर याचे उत्तर नक्कीच दिले पाहिजे.आमच्या मतदारसंघात विकासकामे होत नव्हती, आम्हाला निधी मिळत नव्हता, आमच्याकडे पाच पाच मंत्रिपदे होती, पण फक्त नावालाच होती, अशी हतबलता व्यक्त करणारे मंत्री गेल्या अडीच वर्षांत मग राजीनामा देऊन का रिकामे झाले नाहीत. पदाला चिकटून बसायचे, त्या पदाचा मान, सन्मान मिळवायचा आणि आम्हाला काहीच करता आले नाही असे म्हणायचे म्हणजे आपली हतबलता स्पष्ट करण्यासारखे आहे. आपल्याला संधी देऊनही काहीच जमले नाही असा तर त्याचा अर्थ होत नाही ना....

शंभूराज देसाई असोत किंवा महेश शिंदे या दोन्ही आमदारांनी कधीही शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न केला नाही, असे त्यांचेच कार्यकर्ते खासगीत आणि उघडपणे देखील सांगत आहेत. उलट त्यांनी आपला गट तयार केला. कधीही बाहेर पडावे लागले तर अडचणी वाढायला नकोत यासाठी त्यांनी या गटाच्या माध्यमातून आपली ताकद वाढविण्यासाठीच कायम प्रयत्न केले. त्यामुळेच आज त्यांच्यासोबतचे गट शिवसेनेच्या विरोधात बाहेर पडले आहेत. मूळ शिवसैनिक हा कधीही पक्ष सोडून इतर कोणाच्या सोबत जाणार नाही. त्याची बांधिलकी ही पक्षाशीच कायम राहणार. त्यामुळे शिवसेनेला कितीही हादरे बसले आणि कितीही नेते बाहेर पडले तरी शिवसेना मजबूत राहिली आणि राज्यात सत्तेवर देखील आली.शिवसेनेला विचारात घेतल्याशिवाय कोणत्याच पक्षाला राज्यात आपले सरकार बनविता येणार नाही, एवढी ताकद शिवसेनेने निर्माण केली आहे. याला एक पिढी द्यावी लागली आहे. त्या पिढीने शिवसेना मजबूत बांधली असली तरी बाह्यशक्ती या कायम त्रासदायकच ठरत असतात. त्यांचा बंदोबस्त करण्याचे काम प्रत्येक पिढीला करावे लागते. अन्यथा, थोडे जरी कमी पडलो तरी अशी अवस्था होते.उद्धव ठाकरे हे आपल्याच पक्षातील नेत्यांना वेळ देण्यात कमी पडले असतील ही बाब मान्य करायला हरकत नाही. बराच काळ ते आजारी असल्यामुळे ही गोष्ट गृहीतच धरली आहे. तरीदेखील राज्यमंत्री म्हणून संधी देऊन पाच मंत्रिपदे देऊन काहीच करता आले नाही, अशी जर अगतिकता व्यक्त करणार असाल तर ती कोणीच ऐकून घेणार नाही. जे लोक आपल्या मतदारसंघात कामे करता आली नाहीत असे म्हणत आहेत, त्यांच्या मतदारसंघात ५० काय अडीचशे कोटींची कामे झाली आहेत. हे पैसे कोठून आणले याचाही जाब लोक विचारणार आहेत.कोरेगावसाठी ४० कोटीची योजना मंजूर, विशेष निधीतून कोरेगावसाठी १५ कोटी, कोरेगावातील २५ गावांना पाच कोटी, कोरेगाव मतदारसंघात जलसंधारणासाठी ३७ कोटी, जलसंधारणासाठी साडेतीन कोटी ही महेश शिंदे यांची पोस्टरबाजी आहे. जर मतदारासंघासाठी निधीच मिळत नाही म्हणता तर मग ही कामे कोठून आणली. कशातून पैसे खर्च करण्याचे नियोजन केले. अशीच परिस्थिती शंभूराज देसाई यांची आहे. दर दहा पावलांवर यांच्या विकासकामांचे बोर्ड लावून स्वत:ची पाठ थोपटून घेण्याची सवय लागली आहे की काय, असा सवाल कार्यकर्ते विचारू लागले आहेत.

दोन्ही नेत्यांनी सेना शाखांची माहिती द्यावी

शिवसेनेसाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटना कशी वाढवायची आणि त्यासाठी काय कष्ट घ्यावे लागतात याची जाणीव आहे. पण, ज्यांनी एकही शाखा काढली नाही, शिवसेनेच्या वाढीसाठी प्रयत्न केले नाहीत, ते आम्ही अजूनही शिवसेनेत आणि शिवसेनेचे असल्याचे म्हणत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेShambhuraj Desaiशंभूराज देसाईMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ