लोणंद : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दि. २३ रोजी सातारा येथील बॉम्बशोधक व नाशक पथक सातारा यांनी नीरा नदीवरील पुलाची श्वानाच्या साह्याने तपासणी मोहीम राबविली.संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा दि. २ जुलै रोजी सातारा जिल्ह्यात प्रवेश करीत आहे. नीरा नदीवरील श्री दत्त घाट या ठिकाणी माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्याची ७०० वर्षांची परंपरा आहे. हा सोहळा पाहण्यासाठी नदीकाठी लाखो भाविक गर्दी करतात.त्यानंतर लोणंद येथील मुख्य पालखीतळावरील आणि संपूर्ण नीरा ते लोणंद पालखी मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने घातपात विरोधी बॉम्बशोधक पथकाने तपासणी मोहीम राबविली. यावेळी पोलीस नाईक मोरे, दयाळ, निकम व जाधव यांनी तसेच पोलीस बॉम्बशोधक श्वान सूर्याने सहभाग घेतला. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेतली आहे.पालखी मार्गाची होणार तपासणी
या तपासणीत कुठेही काही संशयास्पद आढळून आले नसून, हे पथक पुढे तरडगाव, फलटण, बरड अशा संपूर्ण पालखी मार्गावर तपासणी करणार आहे.