कऱ्हाड : येथील कऱ्हाड नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या गाडीला चार महिन्यांनंतर मुहूर्त मिळाला. चार महिन्यांपासून खासगी गाडीने प्रवास करणाऱ्या पालिकेच्या नगराध्यक्षा अॅड. विद्याराणी साळुंखे यांच्या सेवेसाठी पालिकेची नवीन गाडी प्राप्त झाली. चार महिन्यांनंतर अखेर नगराध्यक्षांना नवी कोरी गाडी मिळाली.दि. १६ जूनला कऱ्हाड पालिका नगराध्यक्षांच्या जुन्या गाडीचा लिलाव झाल्यापासून मंजुरीच्या लालफितीत अडकलेल्या नवीन गाडीचे सोमवारी चार महिन्यांनंतर पालिकेत आगमन झाले. मंगळवारी पालिकेच्या विशेष सभेला नगराध्यक्षा अॅड. विद्याराणी साळुंखे नवीन गाडीतून आल्या.येथील पालिकेच्या नगराध्यक्षांसाठी २००६ मध्ये अॅम्बेसिडर खरेदी करण्यात आली होती. पेट्रोल वाहन व सातत्याने होणाऱ्या बिघाडामुळे ते विकण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यानुसार तसा गाडीच्या लिलावाचा ठरावही करण्यात येऊन गेल्या नोव्हेंबरपासून नवीन वाहन खरेदीच्या प्रस्तावाची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, जुन्या वाहनाचा लिलाव झाल्याशिवाय नवीन वाहन घेता येणार नसल्याचे वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार जुन्या गाडीचा लिलाव करण्यात आला. नगराध्यक्षांच्या जुन्या गाडीचे येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून सुमारे सत्तर हजारांचे मूल्यांकन करण्यात आले. त्यानुसार लिलावप्रक्रिया बोलाविण्यात आली. मात्र, गाडीची किंमत जास्त असल्याने खरेदीदारांनी लिलावप्रक्रियेकडे पाठ फिरविली. दोनवेळा लिलाव घेण्यात आल्यानंतरही गाडीला कोणीच बोली लावली नसल्याने अखेर तिसऱ्या लिलावावेळी गाडीचे फेर मूल्यांकन ४३ हजारांवर करण्यात आले. त्यानंतर बोलाविलेल्या लिलावप्रक्रियेस खरेदीदारांचा प्रतिसाद मिळाला. त्यावेळी निर्माण झालेल्या बोलीच्या चढाओढीत जुन्या गाडीची एक लाख ७० हजारांला विक्री करण्यात आली. त्यामुळे पालिकेला अपेक्षेपेक्षा अधिक रक्कम बोलीतून प्राप्त झाली.नगराध्यक्षांच्या गाडी खरेदीला जिल्हाधिकारी यांनी अंतिम मंजुरी दिल्यानंतर अखेर सातारा येथून मंगळवारी कऱ्हाडच्या नगराध्यक्षांसाठी नवीन कार खरेदी करण्यात आली. व ती कऱ्हाड येथे आणण्यात आली. तब्बल चार महिने नगराध्यक्षांना खासगी गाडीने प्रवास करावा लागला. आता नवी गाडी उपलब्ध झाल्याने त्यांची या त्रासापासून सुटका झाली आहे. (प्रतिनिधी)नवीन गाडीची किंमत साडेसात लाख कऱ्हाड पालिकेच्या नगराध्यक्षा अॅड. विद्याराणी साळुंखे यांच्या वापरासाठी पालिकेने अखेर चार महिन्यांनंतर नवीन पांढऱ्या रंगाची गाडी तब्बल साडेसात लाखांना खरेदी केली आहे. त्यामुळे पूर्वीच्या गाडीनंतर आता नवीन गाडीतून नगराध्यक्षा प्रवास करणार आहेत. त्रासापासून सुटकानगराध्यक्षांची खासगी गाडीने प्रवास करण्याच्या त्रासापासून सुटका झाली असून, आता पालिकेच्या नवीन गाडीतून नगराध्यक्षांना दिमाखदारपणे प्रवास करता येणार आहे.
नगराध्यक्षांच्या दिमतीला पालिकेची नवीकोरी गाडी
By admin | Published: October 21, 2015 9:44 PM