लोकमत न्यूज नेटवर्क
पाचगणी : काटवली, ता. जावळी येथील ओढ्यावर जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने जिल्हा वार्षिक नियोजनांतर्गत चार महिन्यांपूर्वी बांधलेल्या चौदा लाखांच्या सिमेंट बंधारा पाण्याच्या झोताखालील भाग मुसळधार पावसात पाण्याच्या प्रवाहाने उखडून पडला आहे.
काटवली येथील शिंदेवाडी आणि काटवली या गावांच्या मध्यभागी असणाऱ्या ओढ्यावर भातपिकांच्या तसेच ज्वारी, गहू यासारख्या पिकांना पाणी मिळावे, याकरिता वळण बंधारा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत लघु पाटबंधारे विभागाच्या वार्षिक योजनेतून १४ लाख रुपये खर्चाचा सिमेंट बंधारा नुकताच मे महिन्यात बांधला गेला होता. त्याचा उपयोग शेतीला पाणी देण्याकरिता होणार होता. या बंधाऱ्याची पहिल्याच पावसात वाताहत झाली असून, बांधकामाचे पितळ उघडे पडले आहे. वाहून गेलेला बंधाऱ्याच्या पुढील भागाची वेळीच दुरुस्ती न केल्यास पुन्हा अतिवृष्टी झाल्यास उर्वरित बंधाराच उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.
फोटो : २७पाचगणी काटवली बंधारा
काटवली, ता. जावळी येथील ओढ्यावरील बंधारा पाण्याच्या प्रवाहात उखडला आहे. (छाया : दिलीप पाडळे)