जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास करांडे, ग्रामविकास अधिकारी दीपक हिनुकले, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कोठावळे, संदीप साळुंखे, कपिल जाधव, योगेश गोतपागर, नितीन जाधव, नवनाथ करांडे, मयूर जाधव आदींची उपस्थिती होती.
नदीपात्रातील जॅकवेलसाठी पूर्वी वीज पुरवठा सैदापूर फिडरवरून केला जात होता; तर पाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी कोपर्डे हवेली फिडरवरून वीज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणांवरून वीज पुरवठा असल्यामुळे एखाद्या ठिकाणचा पुरवठा खंडित झाल्यास त्याचा परिणाम दोन्ही ठिकाणी होत होता. परिणामी, गावात कृत्रिम पाणी टंचाई जाणवत होती. त्यासाठी ग्रामपंचायतीने कोपर्डे हवेली फिडरवरून एकाच ठिकाणावरून वीज पुरवठा व्हावा, अशी मागणी कंपनीकडे केली होती. त्याची ताबडतोब दखल घेऊन कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख, उपकार्यकारी अभियंता नवाळे यांनी कार्यवाही केली. दोन्ही ठिकाणी एकाच गावातील फिडरवरून वीज मिळणार असल्याने तांत्रिक अडचणी कमी होणार आहेत.
फोटो : २७केआरडी०८
कॅप्शन : बनवडी (ता. कऱ्हाड) येथे नवीन फिडरचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विकास करांडे, ग्रामविकास अधिकारी दीपक हिनुकले यांच्या उपस्थितीत झाले.