शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

Satara News: भूस्खलनामुळे बाधित ६१४ कुटुंबांंना लवकरच नवीन घरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 11:40 AM

बहुतांशी ठिकाणी जागा खरेदी करण्यासाठी निधी जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग केला

सातारा : महापूर आणि भूस्खलनात बाधित झालेल्या नऊ गावातील ६१४ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येणार असून, या घरांच्या बांधकामाचे भूमिपूजन १० सप्टेंंबरला होईल. तसेच वन विभागाच्या हद्दीजवळील ३० ते ४० गावांतील वन जमिनींना सौर कुंपण व चर खोदण्याच्या कामांचे प्रस्ताव शासनास पाठविण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा लोकल बोर्ड इमारतीचे प्रस्तावित नूतनीकरण, भूस्खलनग्रस्त गावांचे पुनर्वसनासाठी जमिनी ताब्यात घेणे व एमएमआरडीएकडून घराचे मॉडेल तयार करणे, वन जमिनींना सौर कुंपण प्रस्ताव शासनास पाठविणे, आदी विषयांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी म्हणाले, भूस्खलन, पुरामुळे बाधित झालेल्या नऊ गावांतील ६१४ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यासाठी बहुतांशी ठिकाणी जागा खरेदी करण्यासाठी निधी जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग केला आहे. जलसंपदा विभागाची जागा वर्ग करण्याचा प्रस्ताव असून, तो प्रश्न महिनाभरात सुटेल. पंधरा दिवसांत या घरांच्या बांधकामाचे टेंडर निघणार असून, १० सप्टेंबरला घरांच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात गावातील जी घरे अजूनही धोकादायक आहे त्यांचा सर्व्हे करण्यात येईल.याशिवाय वनविभागाच्या हद्दीतील ३० ते ४० गावांतील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांकडून उपद्रव होत असून, पिकांचे नुकसान होत आहे. त्यासाठी त्या परिसराला सौर कुंपण घालण्याचा प्रस्ताव आहे. शक्य तेथे सौर कुंपण आणि शक्य तेथे चर काढावे, असा प्रस्ताव दिला आहे.शिवाय जिल्हा परिषदेमधील जुन्या लोकल बोर्डाची इमारतीची डागडुजी करून पूर्वी जशी इमारत होती तशीच जुन्या इमारतीचे सौंदर्य व्यवस्थित जतन करण्यात येणार आहे. त्यामध्ये लोकल बोर्डाचे पहिले ते शेवटचे अध्यक्ष यांचे छायाचित्रे व कार्यकाल, इतिहास या इमारतीमध्ये लावावे, अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी दिल्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShambhuraj Desaiशंभूराज देसाई