लक्ष्मण गोरे ।बामणोली : शिवसागर जलाशयाचा शेजार लाभलेल्या सातारा तालुक्याच्या पश्चिमेकडील बामणोली हे मोठ्या संख्येने असणाऱ्या वटवाघळांच्या अस्तित्वामुळे नावारुपाला आलंय. हिरव्यागार सौंदर्यानं नटलेल्या इथल्या वृक्षांवर असंख्य वटवाघळे लटकलेली दिसतात. बामणोलीला येणारे पर्यटक उत्सुकतेने व कुतूहलाने या वटवाघळाकडे पाहतात. हजारोंच्या संख्येने ही वटवाघळे पाहून त्यांनाही आश्यर्च वाटते. कधी-कधी त्यांच्या अंगावर व गाडीवर झाडावर लटकल्या वटवाघळांची विष्टा पडते; परंतु कोणीही याबद्दल नाराज होत नाही.बामणोली एरव्ही बोटिंग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या बामणोलीच्या वैभवात या हजारो वटवाघळांनी भर घातली आहे, ते म्हणजे मागील चार-पाच वर्षांच्या सून, नीलगिरी व आर्केशियाची मोठी झाडे या हजारो वटवाघळांच्या लोकसंख्येने भरलेली आहेत. सध्या येथे सुमारे ६० झाडे २० हजारांपेक्षा जास्त वटवाघळांनी भरली आहेत. दिवसभर चीं चीं चीं असा आवाज करत या वटवाघळे झाडांना उलट्या लटकलेले असतात व अंधार पडताच आपल्या अन्नाच्या शोधात ६० ते ७० किलोमीटर अंतरापर्यंत फिरतात.उन्हाळ्यात एप्रिल-मे महिन्यात रात्रीच्या वेळी या वटवाघळे आंबे व इतर फळे खाण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत व सातारा, कोरेगावपर्यंत प्रवास करतात; परंतु सूर्योदयापूर्वी पुन्हा त्या आपल्या झाडावर येऊन बसतात. त्यांच्या ‘चीं चीं चीं’ अशा आवाजाची आम्हाला सवय झाली आहे. बामणोलीतील प्रचंड मोठे नीलगिरी, आॅर्केशिया व वडाची झाडे येथे शेकडो प्रमाणात उपलब्ध असल्याने व शेजारी जलाशय व आजूबाजूला जंगल संपत्ती व त्यांना लागणारी फळझाडे व त्यांची फळे या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच या ठिकाणचे भौगोलिक व नैसर्गिक वातावरण त्यांच्या प्रजनन क्षमतेस व वाढीस पोषक आहे. या सर्व कारणांमुळे मागील चार-पाच वर्षांत या वटवाघळांची संख्या दुप्पटीने वाढली आहे.वटवाघळे रात्री पोट भरण्यासाठी बाहेर पडतात. एकत्र वसाहत करून राहतात. वडाच्या झाडावर बहुतेक जास्त प्रमाणात ती लटकलेली दिसतात म्हणून त्यांना ‘वटवाघुळ’ असे नाव पडले. वटवाघळे ही फलाहारी आहेत. वड, पिंपळाची फळे, आंबा, उंबर, पेरू, फणस, चिंचा आदी अनेक फळे व त्यांचा रस फक्त ती खातात. रात्री फिरताना कमी जाडीच्या विजेच्या तारा वटवाघळांना दिसत नाहीत त्यातून त्यांना प्रतिध्वनी ऐकू येत नाही, त्यामुळे ते तारांना धडकतात व चिकटून मरतात. जगात वटवाघळांच्या ९८० जाती आहेत. त्यातील बरीच दुर्मीळ झाली आहेत. काही आदिवासी वाटवाघळांची खाण्यासाठी शिकार करत असल्याने त्यांची प्रजाती नष्ट झाल्या आहेत.वटवाघळे झाडाला का लटकतात?वटवाघळे पाखरासारखे आकाशात उडतात. आकाशात उडणारा तो एकमेव प्राणी आहे. सस्तन प्राण्याप्रमाणे ते पिलांना जन्म देतात. ते पाखरासारखे उडत असले तरी पाखरापेक्षा खूप वेगळे. त्यांच्या प्राण्यांच्या चिरोष्टेरा या स्वतंत्र गटात समावेश होतो. वटवाघळे पंख व हात असलेले प्राणी आहेत.कोणत्याही सस्तन प्राण्यांना पंख नसतात याच प्राण्यांना निसर्गाने पंख का दिले त्यांना उडण्याची कला कशी अवगत झाली. याचे प्राणीशास्त्रज्ञांना नवल वाटते. त्यांचे पंख पक्ष्यासारखे पिसांचे नसतात. पातळ कातड्याचे असतात. हातपाय कातड्यांनी जोडलेले असतात.छत्रीला आधारासाठी जशा तारा असतात. तशी पातळ बागदार हाडे त्यांच्या कातडी पंखात असतात ही हाडे व पायांमुळे त्यांना पंख ताणता येतात पॅराशूटसारखे हवेत तरंगता येते. वटवाघळांना प्रकाश आवडत नाही म्हणून दिवसा ती झाडांना उलटी लटकून झोपतात.वटवाघळांमुळे फळझाडांच्या बियांचा प्रसार होतो ठिकठिकाणी झाडे उगवतात. जंगल वाढते फुलांच्या परागीभवनात त्यांची मदत होते. माणसाचे आरोग्य धोक्यात आणणारे किडे वटवाघळे खातात. पिकांचा नाश करणारे किडे खातात म्हणून वटवाघळे माणसांचे मित्र आहेत. हा निसर्गाचा अनमोल ठेवा माणसाने जतन केला पाहिजे- डॉ. सलीम अली, प्राणीशास्त्रज्ञआमचे आजोबा व वडील सांगायचे धरण (कोयना) होण्यापूर्वी पूर्वीच्या नदीकाठी असणाºया गावांमधील चिंचेच्या व वडाच्या झाडांवर काही शेकड्यामध्ये वटवाघुळ राहत होते. म्हणजे त्यांना बामणोलीचे वातावरण पोषक असावे, असे वाटते. या वटवाघुळ म्हणजे आमच्या गावचा अनमोल नैसर्गिक ठेवा आहे. हा नैसर्गिक ठेवा आम्ही पुढेही जतन करू.- राजेंद्र हरिबा संकपाळ, माजी सरपंच, बामणोलीबामणोलीच्या नैसर्गिक सौदर्यांत व वैभवात वटवाघळांनी भर घातली आहे. कारण तो निसर्गाचा अनमोल ठेवा बामणोलीकरांनी आनंदाने जपला आहे. वनविभागाची प्रादेशिक व वन्यजीव अशी दोन आॅफिस बामणोलीला असल्यामुळे या वटवाघळांना येथे कसलाही धोका पोहोचत नाही.- श्रीरंग पांडुरंग शिंदे, वनपाल, बामणोलीसाताºयाच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या कुशीतील बामणोली गावात हजारोंच्या संख्येने वटवाघळे येथे वास्तव करत आहेत. गावातील झाडांवर उलटे लटकलेले वटवाघळे बघून पर्यटक कुतूहल व्यक्त करतात.
बामणोली बनलंय वटवाघळांचं गाव नैसर्गिक समृद्धतेची नवी ओळख : ६० झाडांवर २० हजारांपेक्षा जास्त संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 11:48 PM
लक्ष्मण गोरे ।बामणोली : शिवसागर जलाशयाचा शेजार लाभलेल्या सातारा तालुक्याच्या पश्चिमेकडील बामणोली हे मोठ्या संख्येने असणाऱ्या वटवाघळांच्या अस्तित्वामुळे नावारुपाला आलंय. हिरव्यागार सौंदर्यानं नटलेल्या इथल्या वृक्षांवर असंख्य वटवाघळे लटकलेली दिसतात. बामणोलीला येणारे पर्यटक उत्सुकतेने व कुतूहलाने या वटवाघळाकडे पाहतात. हजारोंच्या संख्येने ही वटवाघळे पाहून त्यांनाही आश्यर्च वाटते. कधी-कधी त्यांच्या अंगावर व ...
ठळक मुद्देअन्नासाठी ८० किलोमीटरचा प्रवास; पर्यटकांना कुतूहल