शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

लोकमान्यतेसाठी वारसदारांसह नवखेही सज्ज

By admin | Published: November 09, 2016 1:12 AM

जुन्या नव्यांचा मेळ : काँग्रेसची प्रत्येक ठिकाणी तर शिवसेनेची मोजक्याच जागी कडवी झुंज; राजकीय वारसा आणि अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य

खंडाळा : खंडाळा नगरपंचायतीसाठी प्रमुख पक्ष पूर्ण क्षमतेने मैदानात उतरले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकमेकांसमोर कडवे आव्हान निर्माण करण्यासाठी उमेदवार निश्चितीपासूनच फासे टाकले आहेत. राजकीय वारसा आणि अनुभव असलेल्या उमेदवारांसह नवख्यांनाही संधी दिली गेली. जुन्या नव्यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला असला तरी वारसांना की नवख्यांना लोकमान्यता मिळणार, याचेच आडाखे बांधले जात आहेत. नगरपंचायतीच्या पहिल्या सामन्यात दोन्ही काँग्रेसने प्रत्येक जागेवर आपले खेळाडू दमदारपणे उतरविले आहेत तर भाजपाने आणि शिवसेनेने मोजक्याच जागी कडवी झुंज देण्यासाठी कंबर कसली आहे. प्रभागांची रचना आणि मतदारांचा कल घेऊन प्रत्येक पक्षाने योग्य उमेदवार देण्यावर भर दिला. त्यामुळेच जुन्या आणि नवख्यांना संधी निर्माण झाली. पहिलाच सामना चुरशीचा रंगणार, हे निश्चित झाले आहे. प्रभाग एकमधून अनुभवी असलेल्या माजी सदस्य राष्ट्रवादीचे दयानंद खंडागळे यांचा सामना काँग्रेसचे सचिन खंडागळे हे प्रथमच करणार आहेत. प्रभाग चारमधून सदस्या असलेल्या राष्ट्रवादीच्या शारदा खंडागळेंशी नवख्या कल्पना गाढवे यांची लढत आहे. प्रभागत सातमध्ये काँग्रेसमध्ये हुकमी भूमिका बजावणाऱ्या जाधव परिवारातील जयश्री जाधवांशी राष्ट्रवादीच्या नवख्या नंदा गायकवाड लढत देतील. प्रभाग आठमधून माजी सभापती लताताई नरूटे यांचा सामना काँग्रेसच्या हेमलता ठोंबरे करणार आहेत. प्रभाग नऊमधून राष्ट्रवादीचे लक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष व माजी सदस्य अशोक गाढवे यांचा सामना नवख्या दत्तात्रय गाढवे यांना करावा लागणार आहे. सेनेचे गोविंद गाढवे सुद्धा पहिल्यांदा नशीब आजमावणार आहेत. प्रभाग दहामध्ये माजी सरपंच काँग्रेसचे प्रल्हाद खंडागळे यांच्याशी राष्ट्रवादीचे बाळासाहेब गाढवे लढत देत असून, भाजपाचे अभिजित खंडागळे व सेनेचे मंगेश खंडागळेसुद्धा लोकांचा कल घेणार आहेत. प्रभाग ११ मधून माजी सदस्य राहुल गायकवाड यांचा सामना राष्ट्रवादीचे विद्याधर गायकवाड करणार आहेत. प्रभाग बारामधून राष्ट्रवादीचे माजी उपसरपंच जावेद पठाण यांचा सामना काँग्रेसच्या साजिद मुल्ला यांना करावा लागेल. प्रभाग चौदामधून विद्यमान पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध गाढवे यांच्याशी राष्ट्रवादीचे नवखे शैलेश गाढवे टक्कर देणार आहेत. तर प्रभाग सतरामधून माजी सदस्य काँग्रेसचे संतोष बावकर यांच्याशी राष्ट्रवादीचे शरद दोशी लढत देणार आहेत. या तुल्यबळ लढतीमध्ये जनता काय भूमिका घेणार, हे काळच ठरविणार आहे. (प्रतिनिधी) कोणी कासवाच्या तर कोणी सशाच्या गतीने... या निवडणुकीमध्ये पक्षीय धोरणाबरोबरच उमेदवारांचे वैयक्तिक मेरीट मतदारांकडून तपासले जाणार आहे. मात्र, दोन्ही काँग्रेसने एकमेकांसमोर उमेदवारी देताना सापसिडीचा खेळ आखला आहे. त्यामुळे ऐन प्रचारात कोणाचा पाय कोणाच्या पायात अडकणार, यावरच यशाची गणिते मांडता येणार आहेत. त्यातच भाजपा-शिवसेनेच्या सोंगट्या किती घरांमधून उड्या मारणार, हे पाहणेही उत्सुकतेचे ठरणार आहे. शेवटी राजकारणामध्ये कोणीच कोणाला कमी लेखू नये. कारण कुणीही कितीही जोमाने राजकीय शिडी चढला आणि एखादी सोंगटी चुकीची पडली तरी त्याला परतीचा प्रवास ठरलेला आहे; पण सत्तासंघर्षाच्या वाटेवर आपण शर्यतीत आहोत, याची जाणीव प्रत्येकाला असल्याने कोणी कासवाच्या तर कोणी सशाच्या गतीने धावतो आहे. मात्र, शर्यत तोच जिंकणार आहे, जो मतदारांचे मन जिंकणार आहे.