फलटण : ‘सततच्या लॉकडाऊनमुळे व्यावसायिक, शेतकरी, कामगार वर्ग अडचणीत आला असून, सर्वांची आर्थिक स्थिती बिकट बनल्याने निंभोरे ग्रामपंचायतीने मागील आणि चालू वर्षाची घरपट्टी माफ करावी,’ अशी मागणी निंभोरे ग्रामस्थांनी ग्रामसेविकाकडे केली आहे.
मौजे निंभोरे (ता. फलटण) ग्रामस्थांच्या वतीने निंभोरे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका एस. पी. सोनवणे यांना कोरोना परिस्थितीमध्ये लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षापासून अनेकांचे रोजगार गेलेले आहेत. व्यवसाय ठप्प आहेत शेतकरीवर्ग चिंतित आहे. तसेच गावातील अनेक लोकांची आर्थिक परिस्थिती मंदावलेली आहे, अशा परिस्थितीमध्ये निंभोरे ग्रामपंचायतीच्या वतीने आकारण्यात येणारी घरपट्टी (कर) माफ करण्यात यावा, असे निवेदन देण्यात आले.
यावेळी अमित रणवरे, रामचंद्र अडसूळ, मुकुंदराव रणवरे, श्यामराव कांबळे, निशा माने, बशीर शेख, संजय कांबळे, सचिन कांबळे आदी उपस्थित होते.