शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

बेपत्ता चालकाचा खून केल्याचे निष्पन्न

By admin | Published: June 23, 2015 11:50 PM

गुड उकलले : वाई तालुक्यात आसलेजवळ ऊसाच्या फडात मृतदेह दिला पेटवून

शिरवळ : ‘गोव्याला फिरायला जायचे आहे,’ असे सांगून भाड्याने घेतलेल्या कारवरील बेपत्ता चालकाचे गुड उकलण्यात शिरवळ पोलिसांना यश आले आहे. कार भाड्याने घेतलेल्या तिघांनी चालकाचा खून करुन मृतदेह वाई तालुक्यातील आसलेजवळ ऊसाच्या फडात पेट्रोल टाकून जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलासह तिघांना अटक केली आहे.शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील भाऊसाहेब खोमणे यांच्याकडील कार (एमएच १२ केएन ११६५) ही गोव्याला नेण्यासाठी सोमवार, दि. १५ रोजी रात्री आठच्या सुमारास घेऊन गेले होते. त्यावेळेस खोमणे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर गुरुवार, दि. १८ पर्यंत गाडी घेऊन पुन्हा शिरवळला आणण्याचे ठरले. दरम्यान, खोमणे यांनी १५ ते १८ पर्यंत चालक लक्ष्मण आबासाहेब जाधव (वय २६, रा. शिरवळ मुळ रा. उपळाई, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) याच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. यावेळी खोमणे यांनी शनिवार, दि. २० रोजी शिरवळ पोलीस दूरक्षेत्रात चालकाचे अपहरण केल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तपास केला. यातून मोठ्या शिताफीने बावधन येथील विकास अनिल जाधव (२०), विलास लालसिंग गायकवाड (२३) व एका अल्पवयीन मुलाला सोमवारी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना खाक्या दाखविताच संबंधितांनी चालक लक्ष्मण जाधव याला उंब्रज हद्दीत भाड्यावरुन झालेल्या वादावादीतून चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची कबूली दिली. जाधव याच्या मृत्यूची खात्री पटल्यानंतर संबंधितांनी मृतदेह आसलेजवळील एका ऊसाच्या फडात टाकला. (प्रतिनिधी)पथकाला बक्षिस जाहीरया घटनेचा ७२ तासांत तपास लावलेल्या पथकातील पोलीस जवानांच्या कार्याची अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दखल घेतली असून त्यांना बक्षीस देण्याचे घोषित केले आहे.बेपत्ता चालक लक्ष्मण जाधवचा खून प्राथमिक दर्शनी भाड्याच्या वादातून झाल्याचे दिसत असले तरी तपासात त्याला अनेक कांगोरे असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे यात आणखी कोण सामील याचा आहेत, याचा शोध सुरू आहे.