जगदीश कोष्टीसातारा : वटपौर्णिमा हा सुवासिनींचा सण. या दिवशी सर्वच महिला वड पूजण्यासाठी जाताना अंगावर दागदागिने घालून जातात. यामुळे साताºयातील बँकांमधील नव्वद टक्के लॉकर या सणाला उघडले गेले. याच दागिन्यांवर डोळा ठेवून चोरट्यांनी बुधवारी महिलेच्या अंगावरील गंठण लंपास केले. दागिने चोरीपेक्षा सुवासिनीचं लेणंच गेल्याने हळहळ व्यक्त होते.सातारा जिल्'ात गेल्या काही वर्षांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली. त्यामुळे बहुतांश सातारकर घरात दागिने ठेवण्याचा धोका पत्करत नाहीत. आवश्यक तेवढे महत्त्वाची दागिने घरात ठेवून बाकीचे सर्व दागिने बँकेत लॉकरमध्ये ठेवले जातात. सणवार, लग्न समारंभात ते उघडले जातात. काम झाल्यानंतर तत्काळ दुसºया दिवशी पुन्हा ते लॉकरमध्ये आणून ठेवले जातात.
बँक अधिकाºयांचा अनुभव पाहता दसरा, दिवाळी, गौरी-गणपतीपेक्षा लग्नसराई अन् वटसावित्री पौर्णिमा या दिवशी बँकांमधील लॉकर्स ग्राहकांकडून जास्त प्रमाणावर उघडले जातात. सण झाल्यानंतर काही ग्राहक लगेच संध्याकाळी तर काहीजण दुसºया किंवा तिसºया दिवशी दागिने बँकेत आणून लॉकरमध्ये ठेवतात.सणादिवशी महिला दागिने घालून बाहेर पडल्यानंतर दागिने हिसकावण्याचे प्रकार घडत आहेत. शाहूपुरी येथील एलआयसी कॉलनीतील सोनाली विजय शिंदे (वय ३८) या वटपौर्णिमेनिमित्त वड पूजनासाठी जात होत्या. अंगावर सोन्याचे दागिने घालून त्या घराबाहेर पडल्या. पूजेचे साहित्य घेऊन त्या दुचाकीवर बसत होत्या. दरम्यान, पाठीमागून भरधाव एक दुचाकी आली. त्यावर मागे बसलेल्या एकाने सोनाली शिंदे यांना धक्का दिला. त्यांची दुचाकी पडू लागल्याने त्या वाकल्या, इतक्यात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीचे पाच तोळ्यांचे गंठण व दोन तोळ्यांचे मिनी गंठण हिसकावले.सौभाग्याचं लेणं चोरीला गेल्यानं हळहळदागिने चोरीला गेल्याच्या दु:खापेक्षा गंठणमागे असलेल्या भावना महत्त्वाच्या असतात. ते सहजासहजी घेतले जात नाही. वटपौर्णिमेला पूजनासाठी जातानाच सौभाग्याचं लेणं चोरीला गेल्याने महिलांमधून हळहळ व्यक्त होते.
दिखाऊपणाच येतो अंगलटवटसावित्री पौर्णिमेला गावातील, गल्लीतील सर्व महिला वडाची पूजा करण्यासाठी गावाबाहेर जातात. महिलांमध्ये नेहमीच इर्षा असते. इतरांपेक्षा आपणाकडे कसे दागिने मोठ्या प्रमाणावर आहेत, हे दाखविण्याची ही एक नामी संधी असते. त्यामुळे या सणाला जास्त प्रमाणावर दागिने घातले जातात. याचा फायदा चोरटे उचलतात.केवळ बँकेच्या लॉकर्समध्ये दागिने ठेवून काय फायदा? त्यामुळे सण म्हटलं तर दागिने घातले जाणारच. त्यातच वटपौर्णिमेला केवळ महिला गेलेल्या असतात. तेथे पुरुष मंडळी नसतात. याचाच फायदा चोरटे उचलतात. त्यामुळे आम्ही शक्यतो गटागटानेच जात असतो.- सोनाली बुटेसातारा.