शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

नववी पास डॉक्टरकडून गर्भलिंग तपासणी -आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 11:46 PM

केवळ नववी पास असूनही डॉक्टरच्या थाटात गर्भवती महिलांचे गर्भलिंग निदान करणाऱ्या तरुणाला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, या आरोपीला तीन मुली असून माण-खटावच्या दुष्काळी

ठळक मुद्देसोनोग्राफी मशीन घेऊन मोटारसायकलवर फिरता दवाखाना

सातारा : केवळ नववी पास असूनही डॉक्टरच्या थाटात गर्भवती महिलांचे गर्भलिंग निदान करणाऱ्या तरुणाला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, या आरोपीला तीन मुली असून माण-खटावच्या दुष्काळी भागात मोटारसायकलवर फिरून तो हा गोरख धंदा करायचा.

याबाबत माहिती अशी की, औंध परिसरात नाथा सहदेव खाडे (वय ३१, रा. धामणी, पो. पिंपरी, ता. माण) हा मोटारसायकलीवर पाठीमागे पिवळ्या रंगाची मोठी सॅक घेऊन संशयितरीत्या फिरत होता. त्याला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे यांच्या पथकाने ताब्यात घेतले.

त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सोना स्टार कंपनीचे सोनोग्राफी मशीन, मोटारसायकल (एमएच ११ सीएन ५९०६) आणि मोबाईल फोन असा एकूण २ लाख २६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. गर्भलिंग निदान करण्यासाठी तो दुष्काळी भागातील गावोगावी मोटारसायकलवर मशीन घेऊन फिरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तेव्हा पोलिसांनी त्याला अटक करून मुद्देमाल ताब्यात घेतला.

तो केवळ नववी पास असून त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नाही. तरीही मशीनद्वारे गर्भवती महिलांची गर्भलिंग निदान तपासणी करत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. या दुष्काळी भागातील एका डॉक्टरकडे काम करत असताना त्याने निदानाची तांत्रिक माहिती घेतली होती. दरम्यान, तपासणीनंतर गर्भपातासारखे प्रकार केले गेले काय, याचाही शोध पोलीस घेत आहेत.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे, सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, संजय पवार, ज्योतिराम बर्गे, मोहन नाचण, योगेश पोळ, रवी वाघमारे, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, मोनाली जाधव, प्रवीण कडव, गणेश कचरे, मारुती अडागळे यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.अवघ्या पाच हजारांत घरपोच सेवानाथा खाडे हा काही महिन्यांपूर्वी औंध परिसरातील एका डॉक्टरकडे काम करत होता. त्याच्या हाताखालीच त्याने गर्भलिंग तपासणीचे प्रशिक्षण घेतले. त्या ठिकाणी कॉन्टॅक्टचा वापर करत होता. लोकांनी त्यांना फोन केल्यानंतर तो त्यांना घरपोच सेवा देत होता. अवघ्या पाच हजारांपासून २० हजार रुपयांपर्यंत तो गर्भलिंग तपासणी करून देत होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfraudधोकेबाजी