वाई : बोपेगावच्या (ता. वाई) सरपंचपदी नितीन लक्ष्मणराव पाटील यांची तर उपसरपंचपदी नारायण निवृत्ती शिंदे यांची बिनविरोध निवड झाली.
येथील ग्रामस्थांनी एकविचाराने ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरविले. सात जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली होती. बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच निवडीची बैठक झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रुपेश एस. मोरे यांनी काम पाहिले. ग्रामसेवक रामदास निंबाळकर यांनी त्यांना सहकार्य केले.
यावेळी सरपंचपदी नितीन पाटील यांची तर उपसरपंचपदी नारायण शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित सदस्य किशोर जाधव, सुदाम जाधव, मोहिनी कानडे, आरती तरडे, यशोदा शिंदे, सुजाता जाधव, अश्विनी जाधव, तसेच शांताराम जाधव, प्रमोद शिंदे, महादेव जाधव, राजेंद्र शिंदे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत जाधव, सुधीर जाधव, राजेंद्र कानडे, सोपान जाधव, सदाशिव शिंदे, धर्मेंद्र जाधव, पोपट शिंदे, महेंद्र यादव, सुनीता जाधव, संजय शिंदे आदी उपस्थित होते.
सरपंच नितीन पाटील व उपसरपंच नारायण शिंदे यांचे आमदार मकरंद पाटील, पंचायत समितीच्या सभापती संगीता चव्हाण, उपसभापती विक्रांत डोंगरे, शशिकांत पिसाळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे, प्रतापराव पवार आदींनी अभिनंदन केले.
फोटो ओळ - नवनिर्वाचित सरपंच नितीन पाटील, उपसरपंच नारायण शिंदे व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.