सातारा : गणेशोत्सव म्हटला की मोठा डामडौल असे समजले जाते. पण, परळी भागातील सावलीसारख्या गावातील गणेश मंडळाने कोणताही गाजावाजा न करता आपला आदर्श इतरांसमोर ठेवला आहे. या मंडळाने अनेक उपक्रम राबविले असून ते वाखाणण्याजोगे आहेत. येथील गणेशोत्सवात वर्गण घेतली जात नाही तसेच गुलालाची उधळण व डॉल्बीचा आवाजही नसतो हे विशेष.
गणेशोत्सव म्हटला की तो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यासाठी हजारो रुपये खर्च करण्यात येतात. डॉल्बीचा दणदणाट असतो. पण, अलीकडील काळात याला फाटा मिळू लागला आहे. अशाचप्रकारे सातारा तालुक्यातील सावली या गावच्या गणेशोत्सव मंडळाचे कार्यही आदर्श घेण्यासारखे आहे.
साताºयापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर सावली हे गाव आहे. उरमोडी धरणाच्या वरच्या भागात असलेल्या या गावाची लोकसंख्या ६०० च्या आसपास आहे. येथे सार्वजनिक क्रिडा गणेश उत्सव मंडळ कार्यरत आहे. या मंडळाने आतापर्यंत विविध उपक्रम राबविले आहेत. या मंडळाला महाराष्ट्र शासनाचा २०१६ मध्ये सजावट स्पर्धेतील जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. तसेच २००८, २००९, २०१० ला गणराया अॅवॉर्डही मिळाला आहे. हे मंडळ वर्गणी घेत नाही तसेच गुलालही उधळला जात नाही, डॉल्बीचा दणदणाट नसतो.
विशेष म्हणजे गणेशोत्सवात ८० टक्केमहिलांचा सहभाग असतो. दरवर्षी मंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांना एक रुपयात पढंरपूर यात्रा घडविली जाते. यावर्षीही मडंळाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. परळी विभागातील शाळेतील गरजू मुलांना शालेय साहित्याचे वाटप तसेच परिसरातील ज्येष्ठांचा सत्कार करण्यात येणार आहे. या ज्येष्ठांची येण्याजाण्याची सोय मंडळाच्या वतीनेच करण्यात येणार आहे. मंडळाची वैशिष्टे...
पारंपरिक वाद्यात गणेशमूर्तीची मिरवणूकवर्गणी विरहीत गणेशोत्सव आणि सामाजिक उपक्रमसमाजप्रबोधनात्मक सजावट सजावटीत इकोफ्रेंडली वस्तूंचा वापरपुरूषांऐवढाचा महिलांचाही सहभाग चित्रफित अन् सामाजिक कार्यातून राबविलेले उपक्रम असे वीर जवान तुझे सलाम व्यसनाला मुक्ती, जिवनाला गतीएकतरी रुजवूया बी...अण्णा हजारे एक आदर्श व्यक्तीमत्वलेक वाचावा, देश वाचवासंतांची शिकवण शिवचरित्र खाशाबा जाधव यांचा जीवनपट...
यावर्षी क्रीडा वैभवात मानाचा तुरा रोवणारे व भारताला पहिले आॅलिंपिक पदक मिळवून देणारे सातारा जिल्ह्यातील खाशाबा जाधव यांचा जीवनपट दाखविण्यात येणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील क्रीडारत्नांच्या कारकिर्दीला उजाळा मिळण्यासाठी चित्रफितद्वारे लघुपट सादर करण्यात येणार आहे.