सातारा : येथील दीपलक्ष्मी पतसंस्थेच्या ‘दरमिया आपके हमारे,’ गझल आणि कवितांच्या मैफलीत सातारकर रसिक मंत्रमुग्ध झाले. सुमारे तीन तास रंगलेल्या या कार्यक्रमाने रंगत आणली. ‘नाही अजून झाली माझ्या-तुझ्यात चर्चा.., माझ्या तुझ्यातल्याची साऱ्या जगात चर्चा,’ या कवितेने श्रोत्यांना खिळवून ठेवले.येथील दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये पतसंस्थेने ‘दरमिया आपके हमारे..,’ गझल आणि कवितांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास रवींद्र बेडकिहाळ, पतसंस्थेचे संस्थापक शिरीष चिटणीस, अध्यक्ष रवींद्र झुटिंग, डॉ. संदीप श्रोत्री, सुरेखा रानडे, भगवान नारकर, अप्पासाहेब शालगर, अनिल चिटणीस, सुभाष मगर आदी उपस्थित होते. ‘दरमिया’ या कार्यक्रमाची सुरुवात ‘यादो के पन्ने जब शाम को फडफडाते है, तो यादो के साथ तुम चले आते हो,’ या कवितेने व ‘सुरमई शाम इस तरह आये सांस लेते है इस तरह सारे सुरमई शाम’ यासुरेश वाडकर यांच्या गझलने झाली. त्यानंतर ‘एवढे फिरून सांग तू काय कमावले.., थांबताच मी मला विचारतात पावले.. उगा फुलांना त्रास कशाला आहे तुझा निश्वास उशाला,’ अशा कविता व गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली. ‘आज तुझे खुशाल गाल लाल होऊन जाऊ दे.., तर तुमको देखा तो ये खयाल आया. जिंदगी धूप तुम घना साया..,’ या गझलना रसिकांची पसंती मिळाली. कार्यक्रमाच्या शेवटी गायक डॉ. केदार वळसंगकर यांनी ‘भावना जाळून जा तू, जा मला टाळून जा तू.., मैफलीचा अंत आला भैरवी माळून जा तू,’ या गीताने झाली. या कार्यक्रमाला अकबरभाई शेख, भुजबळ सर, भैयू चिटणीस, श्रीकांत सोनवणे, विनायक भोसले, रवींद्र कळसकर, शंकर वाघ, गणेश बोडस, सुभाष देशमुख, धनंजय कान्हेरे, अभय देवरे, सुनील मोरे, अभिनंदन मोरे, आग्नेश शिंदे, प्रशांत चोरगे आदी उपस्थित होते.शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. प्रतीक गवळी यांनी निवेदन केले तर रवींद्र झुटिंग यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
नाही अजून झाली माझ्या-तुझ्यात चर्चा...
By admin | Published: May 24, 2015 9:51 PM