शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

घुंगराचा आवाज खेची दुष्काळग्रस्तांचे पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:06 PM

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यात सूर्यनारायण आग ओकत आहेत. गेल्या आठवड्यात सरासरी ४३ अंश सेल्सिअसच्या घरात तापमानाचा पारा पोहोचला होता. ...

वरकुटे-मलवडी : माण तालुक्यात सूर्यनारायण आग ओकत आहेत. गेल्या आठवड्यात सरासरी ४३ अंश सेल्सिअसच्या घरात तापमानाचा पारा पोहोचला होता. त्यामुळे माणदेशी माणसाचा जीव कासावीस होत आहे. या जीवाला थंड करण्यासाठी गावोगावी फिरते रसवंतीगृह येऊ लागले आहेत. त्यातील घुंगराचा आवाज आला की, आपसूक जीवाला थंड करण्यासाठी माणसांची पावले त्याकडे वळत आहेत.माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथे आठवडा बाजारातील खळखळाट करून मंत्रमुग्ध करणाऱ्या घुंगराचा आवाज ऐकवत चालत्या फिरत्या टमटममध्ये ताजा उसाचा रस मिळत असल्याने नागरिकांची पावले आपोआप त्या दिशेने वळत आहेत. आधीच दुष्काळ त्यातच कडक उन्हाच्या झळा वाढल्याने नागरिकांची दमछाक होत आहे. अशातच उसाचा रस पिल्याने मनाला व शरीराला थंडावा मिळत आहे.ग्रामीण भागातील भरणाºया आठवडा बाजारात शरीराला थंडावा देणाºया कलिंगड, काकडीसह उसाच्या रसाची विक्री जोमाने सुरू आहे. कडक उन्हातून दमून भागून आलेले बाजारकरी उसाचा रस पिऊन मन शांत करत आहेत.मे महिन्यात सूर्यनारायण कोपला असल्याने वातावरणात उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे घशाला कोरड पडत असल्याने अशातच कानावर रसवंतीगृहाच्या घुंगराचा आवाज कानावर पडला की, थंडगार उसाचा रस पिण्यासाठी बाजारकरू, नागरिकांची धांदल उडत आहे.उन्हाळ्यात शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी थंडगार शीतपेयांना खूप मागणी असते. यामध्ये जास्तकरून उसाचा रस व नारळपाणीही पिले जाते. लिंबू, आलेयुक्त उसाचा आयुर्वेदिक रस पिल्याने शरीराचे तापमान योग्य राखण्याचे काम होते. त्याचबरोबर रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढवून माणसाला टवटवीत आणि ताजेतवाणे करीत असतो. वर्षानुवर्षे भारतीयांच्या आवडीचे असणारे हे पेय आजही लोक मोठ्या आवडीने पीत असतात.गुºहाळांंच्या चाकांना लावलेल्या घुंगराच्या मधूर आवाजाने जाणाºया-येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते आणि आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत आहे. दूरवरून येणारा आवाज ओळखूनच माणूस आता आपण रस घेऊया, असे म्हणत रसवंतीगृहाकडे त्यांची पावले आपोआप वळताना दिसत आहेत.शीतपेयांवर जालीम उपायउसाचा रस हा उन्हाळ्यात थंड होण्यासाठी वापरला जाणारा पूर्वापार जुना व्यवसाय. याच्या जोडीलाच लिंबू सरबत, नारळाचे पाणी वापरले जात असते. मध्यंतरीच्या काही वर्षांमध्ये शीतपेयांनी बाजारात आक्रमण केले. या कंपन्यांनीही तरुणांना याकडे आकर्षित केल्यामुळे युवकांबरोबरच ज्येष्ठ मंडळीही शेतपेयाकडे वळाली होती; पण आता उसाचा रस पिण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे फिरत विक्री करणाºयांनाही चांगले दिवस आले आहेत. त्यांना चांगला रोजगार मिळत आहे.रस ठिकंय; पण बर्फाचे प्रश्नरसवंती गृहावर मिळणारा रस हा सकस आणि आरोग्यवर्धक असतो. मात्र, हा रस थंड करण्यासाठी वापरण्यात येणाºया बर्फाबाबत अनेकांच्या मनात शंका असते. बर्फ गोणपाटामध्ये ठेवण्यात आलेला बर्फ खाण्यासाठी योग्य असेलच असे नाही. सोशल मीडियावरही रस्त्यावर वापरला जात असलेला बर्फ खाण्यायोग्य नसल्याच्या पोस्ट फिरत असतात. त्यामुळे हा बर्फही आरोग्यासाठी चांगला असेलच, याची कोणाला खात्री देता येत नाही. त्यामुळे अनेक ग्राहक बर्फ कमी टाकून किंवा न टाकता देण्याची मागणी करतात.