म्हसवड : माण तालुक्यात तीव्र पाणी टंचाईमुळे नागरिकांना व जनावरांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. शुक्रवारी सायंकाळी माणचे गटविकास अधिकारी आणि टँकरचालक यांच्यात ढाकणी, ता. माण येथील फिडिंग पॉर्इंटवर वादावादी झाल्याचा प्रकार घडल्यावर सुमारे चार-पाच तास टँकरचालकांनी असहकार आंदोलन केले होते. तब्बल पाच तासांनंतर टँकरचालकांनी आंदोलन मागे घेतले.तालुक्यातील सध्या ओढे, नाले, पाझर तलाव, बंधारे विहिरी पूर्णपणे कोरड्या ठणठणीत पडल्याने नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी व जनावरांना पाण्यासाठी शासनाच्या टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास गटविकास अधिकारी जी. डी. शेलार आणि टँकरचालक यांच्यात पहिला टँकर भरून झाल्यावर दुसरा टँकर भरण्यादरम्यान पाणी वाया जाते, ते जाऊ नये पाण्याचा अपव्यय टाळा, यासंबंधी सूचना करत असताना वादावादीचा प्रकार घडल्याने सायंकाळी पाचपासून रात्री दहा वाजेपर्यंत टँकरचालक टँकर फिडिंग पॉर्इंटवर सोडून निघून गेले होते. रात्री दहानंतर काही टँकर भरण्याससुरुवात झाली.तर शनिवार, दि. ११ रोजी शनिवारी सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत ७० टँकर भरण्यातआले होते. १० मे रोजी दिवसभरात ७६ टँकर भरण्यात आले तर दि. ९ मे आंदोलनाच्या आदल्यादिवशी ९६ टँकर भरण्यात आले होते.
असहकार आंदोलन पाच तासांनंतर मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:10 PM