सातारा : शाहूपुरी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन कोळी यांना एका संघटनेने दिलेल्या अवमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने असहकार आंदोलन पुकारले. संघटनेतर्फे सातारा पंचायत समितीच्या आवारात ठिय्या मांडला होता. संपूर्ण दिवस ठिय्या दिल्यानंतर सायंकाळच्या वेळी कक्ष अधिकाऱ्यांनी संघटनेचे निवेदन स्वीकारले.
शाहूपुरी ग्रामपंचायत कार्यालयात २३ जानेवारी रोजी मोहन कोळी कामकाज करत असताना सकाळी साडेअकरा ते बारा या दरम्यान १५ ते २० लोकांच्या जमावाने अनधिकाºयाने ग्रामविकास अधिकाºयांच्या केबिनमध्ये घुसून अचानकपणे त्यांना गाजरांचा हार घातला होता. बुधवार नाका ते मोळाचा ओढा रस्त्याच्या दुरुस्तीचे काम व त्रिशंकू भागातील आकाशवाणी झोपडपट्टी वसाहत भागातील गटार व लाईटचे काम का केले नाही?, अशी विचारणा हे लोक करत होते.
या पार्श्वभूमीवर शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या कर्मचाºयांनी गुरुवारी ग्रामपंचायतीत काम बंद आंदोलन केले. पंचायत समिती सदस्य संजय पाटील, सरपंच गणेश आरडे, उपसरपंच राजेंद्र गिरी, सदस्य सुधाकर यादव, शंकर किर्दत, रमेश धुमाळ, अमित कुलकर्णी, राहुल यादव, राजापुरे यांनीही कर्मचाºयांची बदनामी करणारी प्रवृत्ती ठेचून काढण्याची मागणी केली.दरम्यान, याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी मोहन कोळी यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पंचायत समितीतही महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. पंचायत समितीत ग्रामसेवक ठिय्या मांडून बसले होते. पंचायत समिती सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत, सदस्य राहुल शिंदे यांनी ग्रामसेवक संघटनेची भेट घेऊन आपला पाठिंबा दिला. या प्रकरणात जी मदत लागेल ती करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, वास्तविक, कुठल्याही कामाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा सरपंच व सदस्यांना असतो. तरीही विस्तार अधिकारी संघटनेचे अध्यक्ष खाशाबा जाधव, कर्मचारी संघटना वर्ग ३ चे शितोळे, कर्मचारी संघटना वर्ग ४ चे अध्यक्ष सपकाळ, शाखा अभियंता संघटनेचे अध्यक्ष आर. वाय. शिंदे, कृषी संघटनेचे सचिव केवटे उपस्थित होते.