लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहराला कास, शहापूर योजना व जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे शहराला पाणी टॅँकरची दैनंदिन गरज भासत नाही. केवळ सार्वजनिक कार्यक्रम व उत्सवकाळात नागरिकांकडून टॅँकरची मागणी होते. शहरात केवळ कार्यक्रमांसाठी महिन्याला १५० तर वर्षाला सरासरी १५०० हजार पाणी टॅँकरची गरज भासते.
सातारा पालिकेने पाणी व्यवस्थापनाचे उत्तम नियोजन केले आहे. शहराला तीन योजनांद्वारे पिण्याचे पाणी वर्षभर उपलब्ध होते. केवळ उन्हाळ्याचा एकच महिना काही भागात पाणीटंचाई जाणवते. तसेच काही वेळेस जलवाहिनीला गळती लागल्यास ज्या-त्या भागात टॅँकरद्वारे पाणी दिले जाते. शहराला पाणीटंचाईची भीषण समस्या आजवर कधीच भेडसावली नाही. पाणी योजनांसह शहरातील विहिरी व कूपनलिकांमार्फत शहरात मुबलक पाणी मिळते. नागरिकांकडून केवळ सण, उत्सव काळात पाणी टॅँकरची मागणी होती. सार्वजनिक कार्यक्रमांवेळी देखील पालिकेकडून टॅँकर उपलब्ध केले जातात. अशा सण, उत्सवांसाठी महिन्याला सरासरी १५० तर वर्षाकाठी १५०० टॅँकरची गरज भासते.
(पॉइंटर)
शहराला लागणारे टॅँकर
२०१८ १६२०
२०१९ १४०८
२०२० ४००
२०२१(आतापर्यंत) ६३०
(कोट)
टॅँकरचे पाणी केवळ सण, उत्सवांसाठी
सातारा शहरात फारशी टंचाई जाणवत नाही. जलवाहिनीला गळती लागली, पाणी कमी दाबाने आले तरच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. इतरवेळी केवळ सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सव काळात व सार्वजनिक स्वच्छतेवेळीच टॅँकरची गरज भासते.
- धनंजय जांभळे, नगरसेवक
(कोट)
सातारा शहराची वर्षभरापूर्वी हद्दवाढ झाली आहे. या भागातील पाणी वितरण व्यवस्था सक्षम नसल्याने येथील नागरिकांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. याच भागाला आजवर सर्वाधिक टॅँकरची गरज भासली. हे चित्र आता बदलायला हवे.
- ॲड. वैभव मोरे, शाहूनगर
(कोट)
सातारा शहराच्या पूर्व भागात उन्हाळा सुरू झाला की कमी दाबाने पाणी येते. अशावेळी आम्हांला कधीकधी टॅँकरची गरज भासते. कास धरणाचे काम मार्गी लागल्यानंतर शहराला मुबलक पाणी मिळेल व ही समस्या देखील संपुष्टात येईल.
- प्रशांत कदम, सातारा