शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

ऐकवायला नव्हे तर ऐकायला आलेय-- सुप्रिया सुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 1:40 AM

कºहाड : ‘आज तुम्हाला ऐकवायला नव्हे तर तुमचं ऐकायला आलेय,’ असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी कºहाडात विद्यार्थ्यांशी संवाद साधला

: विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना हजरजबाबी उत्तर; कºहाडामध्ये दीड तास साधला तरुणार्इंशी संवादलोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ‘आज तुम्हाला ऐकवायला नव्हे तर तुमचं ऐकायला आलेय,’ असं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी कºहाडात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती देण्याच्या निमित्ताने त्यांनी फक्त दहा मिनिटे आपले मनोगत व्यक्त केल खरं; पण त्यानंतर तब्बल दीड तास त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर तितक्याच हजरजबाबीपणे त्यांनी उत्तरे दिली. त्या उत्तरामधून त्यांच्या वैचारिक प्रगल्भतेची चुणूकही साºयांच्या लक्षात आली.

येथील वेणुताई चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने ‘जागर युवा संवाद’ या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी हा संवाद साधला. यावेळी माजी मंत्री शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश पाटील, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘स्त्रीभ्रूण हत्या, युवतींची छेडछाड व अत्याचार, हुंडाबळी, युवक-युवतींच्या आत्महत्या’ या संदर्भात विद्यार्थी- विद्यार्थिनींशी संवाद साधला. आणि त्यांची मते जाणून घेतली. स्नेहल परिट, संकेत चव्हाण आदी विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले विचार व्यक्त केले. तर त्यानंतर समोर उपस्थित असणाºया विद्यार्थ्यांनी सुप्रियातार्इंशी संवाद साधला.

महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागांतून शहरात येत असताना बसमध्ये विद्यार्थ्यांकडून होणाºया छेडछाडीबाबतचा मुद्दा प्रिया चव्हाण, पूजा कुंभार, अश्विनी थोरात यांनी मांडला. यावर मुला-मुलींसाठी स्वतंत्र बस असाव्यात काय? मुलींना अगोदर बसमध्ये प्रवेश दिला जावा काय? आदी मुद्यांवर चर्चा झाली. यावर सुप्रियाताई सुळे यांनी ‘बसमध्ये संपूर्ण विद्यार्थी येईपर्यंत बसचालकाने गाडी हलवली नाही पाहिजे,’ अशा प्रकारच्या सूचना आपण एसटी महामंडळाला करू, असे त्यांनी सांगितले.

‘सगळीच चूक मुलांची नसते. असे आमचे पालक आम्हाला घरामध्ये सांगतात. मुली बसस्थानकात मोठ-मोठ्याने बोलतात, हसतात. याचा मुले गैरफायदा घेत असल्याचे आमचे पालक आम्हाला सांगतात, असे श्वेता घोरपडे या विद्यार्थिनीने सांगितले. यावर सुप्रियातार्इंनी मुले बसस्थानकात मोठमोठ्याने बोलत नाहीत का? हसत नाहीत का? असे सांगत मुलींनी पहिल्यांदा आपले विचार बदलायला हवेत. मुले व मुलींच्यात खºया अर्थाने समानता मानायला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

स्त्रीभ्रूण हत्या हा गंभीर विषय बनला आहे. ‘तुम्ही शरद पवार यांच्या एकुलत्या एक कन्या आहात’ म्हणून या हत्या रोखण्यासाठी समाजाला काय संदेश द्याल? असा प्रश्न अनुराधा चव्हाण यांनी उपस्थित केला. त्यावर यासाठी सामाजिक परिवर्तन गरजेचे असल्याचे मत सुळे यांनी व्यक्त केले.विविध प्रश्नांवरील उत्तरे दिल्यानंतर सुप्रियाताई सुळे पुढे बोलताना म्हणाल्या, ‘कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेतील आरोपींच्या फाशीबाबत वर्षभरात निर्णय घेऊ, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तो अद्यापही त्यांना पाळता आला नाही. त्यामुळे आता तीन महिने वाट पाहणार आहे. जर जानेवारीपर्यंत या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली नाही तर १ जानेवारीपासून मुख्यमंत्र्यांना स्वस्थ बसू देणार नाही. आरोपींच्या फाशीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.’

महाराष्टÑात कुठल्याही मुलींची छेड काढली जाणार नाही, याची दक्षता खºयाअर्थाने राज्याच्या गृहखात्याकडून घेतली पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही. यासाठी लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहे.यावेळी कार्यक्रमाला कºहाड जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. आनंदराव पाटील उंडाळकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेश पवार, जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, शालन माळी, नंदकुमार बटाणे, गंगाधर जाधव, सादिक इनामदार, अ‍ॅड. दीपक थोरात, संजय जगदाळे, सविनय कांबळे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.तार्इंना प्रश्न; पण शशिकांत शिंदेकडून उत्तरग्रामीण भागांतील विद्यार्थी जेव्हा राजकारणाच्या प्रवाहात सक्रिय होतात. तेव्हा त्यांनी फक्त पक्षांचे झेंडेच खांद्यावर घ्यावेत, फक्त नेत्यांच्या घोषणाच द्याव्यात, अशी अपेक्षा ठेवली जातेय. राष्ट्रवादीही अशा कार्यकर्त्यांना पुढच्या टप्प्यावर संधी द्यायची वेळ येते तेव्हा त्यांना बाजूला ठेवले जाते, असा प्रश्न एकाने विचारला. त्यावर शशिकांत शिंदे, आर. आर. पाटील ही नेतृत्व चळवळीतूनच पुढे आली आहेत, असे तार्इंनी सांगितले. पण त्यावर संबंधित विद्यार्थ्याचे समाधान झाले नाही. ही बाब शशिकांत शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी माईक हातात घेऊन विद्यार्थी व युवक संघटनामध्ये आम्ही अनेकांना चांगली संधी देतो, असे सांगून त्याचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.मुलं प्रपोज करतात...? हे तर छान आहेसुप्रियातार्इंना प्रश्न विचारताना एका मुलीने तर थेट ‘मुलं प्रपोज करतात,’ असे बोलायला सुरुवात केली. त्यावर सुप्रियातार्इंनी कशाचं प्रपोज? असा उलट प्रश्न केला. त्यावर सभागृहात एकच हशा पिकला. मगं त्या मुलीनं लग्नाचं प्रपोज करतात, असं उत्तर दिलं. त्यावरती सुप्रियातार्इंनी कॉलेजमध्ये शिक्षण घेतानाच प्रपोज करतात. मगं छान आहे. अशी ‘गुगली’ टाकली. मगं तर तुमच्या आई वडिलांचा ताप वाचला. हुंडा द्यायचा तर प्रश्नच नाही, असं हजरजबाबी उत्तर दिलं. मात्र, त्याचवेळी तुम्हाला जीवन साथीदाराची निवड करण्याची संधी मिळाली तर योग्य निवड करा, म्हणजे आयुष्यभर त्रास होणार नाही. असा सल्ला द्यायलाही त्या विसरल्या नाहीत.ताई, हे पण जरा सांगा !मुलींना, महिलांना होणाºया त्रासाबद्दल अनेक मुलींनी बेधडक सुप्रियातार्इंजवळ मते मांडली. त्यावर मुलींनी सक्षम झाले पाहिजे. असे सुप्रिया सुळेंनी ठासून सांगितले. त्यानंतर एका विद्यार्थ्यानं मात्र, तार्इंशी संवाद साधताना लग्न झाल्यावर मुली सासरी येतात. अन् त्यांना सासू-सासºयांचे वागणे छळ वाटू लागते. माहेरी आई-वडिलांना जसे त्या सांभाळतात. तसे सासू-सासºयांना सांभाळायलाही त्यांना सांगा, असे मत व्यक्त केल्यावर सभागृहात खसखस पिकली.