शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

या प्रवृत्ती साताऱ्यात नकोत!

By admin | Published: November 02, 2014 10:35 PM

वेळीच आवर घाला : खंडणीबहाद्दरांच्या वाढत्या उच्छादाविरुद्ध बांधकाम व्यावसायिक एकत्र-बांधकाम क्षेत्राची

सातारा : मंदीसह विविध कारणांनी आधीच अडचणीत आलेल्या बांधकाम व्यवसायावर खंडणीखोरीचे संकट नव्यानेच भिरभिरू लागले आहे. सध्या शहराच्या विशिष्ट भागांमध्येच असलेले हे लोण शहरात पसरायला वेळ लागणार नाही, अशी रास्त भीती या क्षेत्रातील व्यावसायिकांना सतावते आहे. त्यामुळे वेळीच याबाबत विविध समाजघटकांना एकत्र आणण्यासाठी शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी कंबर कसली आहे.शहराच्या हद्दवाढीपासून अनेक समस्या बांधकाम व्यावसायिकांचा रस्ता रोखून उभ्या आहेत. नगरपालिका हद्दीत नव्याने जमिनी उपलब्ध नसल्याने शहराच्या परिघावर आणि उपनगरांतच सर्वाधिक बांधकामे सध्या सुरू आहेत. प्रामुख्याने पूर्वेकडील उपनगरांमधून खंडणीखोरीचा उपद्रव सुरू झाला आहे. या प्रवृत्तींना वेळीच आवर घातला नाही, तर साथीच्या आजाराप्रमाणे हे लोण शहरभर पसरण्यास वेळ लागणार नाही, असे बांधकाम व्यावसायिकांना वाटते. ‘लोकमत’ने याविषयी घेतलेल्या परखड भूमिकेबद्दल बांधकाम व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. या विषयावर मंथन करण्यासाठी ‘क्रिडाई’ आणि ‘बिल्डर्स असोसिएशन’ अशा व्यासपीठांवरून व्यावसायिक एकत्र आले. खंडणीखोर केवळ बांधकाम व्यावसायिकांचीच नव्हे तर अनेकांची डोकेदुखी ठरत असल्याने हॉटेल व्यावसायिक, डॉक्टर्स आणि अन्य क्षेत्रांतील बाधितांना संघटित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. खंडणीसाठी धमकावण्याच्या सुमारे पंधरा ते वीस घटना साताऱ्यात आजवर घडल्या असल्या, तरी भीतीपोटी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यास केवळ तीन ते चार जणच पुढे आले, अशी माहिती व्यावसायिक देतात. याच कारणावरून विजय शिंदे या व्यावसायिकाला मारहाण करण्यात आली होती. सैदापूरला पोलीस अधिकाऱ्याच्याच कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना तर अगदी ताजी आहे. मात्र, सुरुवातीला पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. सातत्याने घडत असलेल्या या घडामोडी साताऱ्यासारख्या शांतताप्रिय शहराला नवीनच आहेत; मात्र खंडणीखोरांचे मनसुबे यशस्वी होऊ लागले, तर हे लोण शहरात इतरत्र पसरायला वेळ लागणार नाही, अशी बिल्डरांना धास्ती वाटते. मंदीच्या काळात बांधकाम व्यावसायिकांची प्राप्ती बऱ्याच प्रमाणात घटली आहे. रेडी रेकनरइतका दरही बांधकामाला मिळत नाही. सरकारी कार्यालयांमध्ये चिरीमिरीसाठी खर्च करावा लागत असून, हद्दवाढीचा निर्णय खोळंबल्याने जमिनी बिगरशेती करून घेतानाही मोठा खर्च येतो. अशा वेळी खंडणीचे संकट उभे राहिले, तर व्यवसायच अडचणीत येईल; किंबहुना तो तोट्यात जाऊन स्थलांतर करावे लागेल, अशी मानसिकता तयार झाली आहे. त्यामुळेच खंडणीच्या संकटाचा मुकाबला ज्यांना-ज्यांना करावा लागतो आहे, अशा सर्व घटकांना आवाहन करून ताकद उभी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. (प्रतिनिधी)आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनखंडणीसाठी धमक्या, मारहाण, तोडफोड अशा घटना वाढत असल्याने या प्रवृत्ती वेळीच रोखाव्यात, असे निवेदन बांधकाम व्यावसायिक सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहेत. याच वेळी याप्रश्नी पुढे काय पावले उचलायची, याविषयी दिशा ठरविण्यात येणार आहे. तसेच, या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन विविध समाजघटकांना करण्यात येणार आहे. .साताऱ्यातील बांधकाम व्यावसायिकांना खंडणीखोरांचा वाढता उपद्रव सहन करावा लागत आहे, ही बाब नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातली आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, याप्रश्नी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. - रवींद्र पवार, बांधकाम व्यावसायिकव्यावसायिकांचे खंडणीखोरांपासून संरक्षण करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. साताऱ्यात ही प्रवृत्ती नव्यानेच दिसू लागली आहे. आधीच अनेक अडचणींनी त्रासलेल्या व्यावसायिकांना आता खंडणीच्या प्रश्नालाही तोंड द्यावे लागणार असेल, तर आम्हाला रस्त्यावर उतरावेच लागेल. - सलीम कच्छी, बांधकाम व्यावसायिक