कऱ्हाड : कºहाड पालिकेचा कारभार गेल्या काही वर्षभरापासून या-ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहत आला आला. मध्यंतरी विशेष सभेच्यावेळी नगरसेविकांच्या पतींनी पालिका सभागृहात डेरा मांडल्याने नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्याने केली. त्याची दखल म्हणून मुख्याधिकाºयांनी ‘त्या’ तेरा नगरसेविकांना याबाबतच्या नोटिसा बजावल्याने नगरसेविकांसह त्यांचे उचा‘पती’खोर नातेवाईक अस्वस्थ झाले आहेत.पालिका सभागृहात सुमारे नऊ महिन्यांपूर्वी विशेष सभा पार पडली होती. यासभेवेळी तेरा नगरसेविकांच्या नातेवाइकांनी पालिका सभागृहात प्रवेश करीत नगरसेवकांच्या आसनावर स्थानापन्न झाले होते. ही बाब पालिका सभागृहाच्या नियमांचे उल्लंघन करणारी आहे. असे म्हणत याबाबत सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज बागवान यांनी जिल्हाधिकाºयांकडे लेखी तक्रार केली होती. यानंतर कºहाड एका कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार मुख्याधिकारी डांगे यांनी संबंधित नगरसेविकांना नोटिसा बजावल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सभागृहात नातेवाइकांनी प्रवेश केल्याप्रकरणी संबंधित नगरसेविकांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते इम्तियाज बागवान यांनी केली आहे. त्यानंतर तब्बल नऊ महिन्यांनी या तक्रारीची दखल घेऊन प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाल्याने संबंधित नगरसेविका अस्वस्थ झाल्या आहेत.जिल्हाधिकाºयांच्या सूचनेनुसार संबंधित नगरसेविकांना मी नोटिसा बजावलेल्या आहेत. त्याला उत्तर देण्यासाठी दहा दिवसांचा अवधी दिला असून, त्यांची उत्तरे प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाहीची दिशा ठरेल.- यशवंत डांगे,मुख्याधिकारी, कºहाड पालिकाया नगरसेविकांनाबजावल्या नोटिसानगराध्यक्षा रोहिणी शिंदे, पल्लवी पवार, मिनाज पटवेकर, अरुणा पाटील, प्रियांका यादव, माया भोसले, कश्मिरा इंगवले, सुप्रिया खराडे, आशा मुळे, शारदा जाधव, अर्चना ढेकळे, सुनंदा शिंदे, अंजली कुंभार,पतींच्या उचापती थांबणार का?कºहाड पालिकेतील ज्या नगरसेविकांना नातेवाइकांमुळे मुख्याधिकाºयांनी नोटिसा बजावलेल्या आहेत. त्यांच्यातील कित्येक नातेवाइकांपैकी पतींचीच पालिकेत ये-जा असते.पत्नी नगरसेविका असली तरी पतीच ‘मेहरबान’ होताना दिसतात. काहीवेळेला सामान्य नागरिकांना याचा त्रासही होतो. याप्रकारानंतर तरी पालिकेतील पतींच्या उचापती थांबणार का? अशी चर्चा नागरिकांच्यात सुरू असल्याची दिसत आहे.
मुख्याधिकाऱ्यांच्या नोटिसीने उचा‘पती’ खोर अस्वस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 1:07 AM
कऱ्हाड : कºहाड पालिकेचा कारभार गेल्या काही वर्षभरापासून या-ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहत आला आला. मध्यंतरी विशेष सभेच्यावेळी नगरसेविकांच्या पतींनी पालिका सभागृहात डेरा मांडल्याने नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्याने केली. त्याची दखल म्हणून मुख्याधिकाºयांनी ‘त्या’ तेरा नगरसेविकांना याबाबतच्या नोटिसा बजावल्याने नगरसेविकांसह त्यांचे उचा‘पती’खोर नातेवाईक अस्वस्थ झाले आहेत.पालिका सभागृहात ...
ठळक मुद्देकऱ्हाड पालिकेत घडतंय-बिघडतंय : सभागृहाच्या नियमांचे उल्लंघन अंगलट; दहा दिवसांत द्यावे लागणार उत्तर