शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
3
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
4
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
5
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
6
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
7
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
8
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
9
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
11
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
12
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
13
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
15
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
16
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
17
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
18
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
19
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
20
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड

कऱ्हाडमध्ये शिवशंकर पतसंस्थेच्या ४३ आजी-माजी संचालकांना नोटिसा, लेखी खुलासा देण्याची सूचना

By प्रमोद सुकरे | Published: November 08, 2023 5:01 PM

प्रमोद सुकरे कऱ्हाड : कऱ्हाड येथील शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्था अडचणीत आल्यानंतर त्याचे लेखापरीक्षण सुरू आहे. सन २००० पासून ...

प्रमोद सुकरेकऱ्हाड : कऱ्हाड येथील शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्था अडचणीत आल्यानंतर त्याचे लेखापरीक्षण सुरू आहे. सन २००० पासून म्हणजे गत २३ वर्षांचे नव्याने लेखापरीक्षण करण्याचे काम होत आहे. दरम्यान, विशेष लेखापरीक्षक धनंजय गाडे यांनी संस्थेच्या सन २००२ पासूनच्या ४३ आजी- माजी संचालकांसह ९ कर्मचारी व ७ ऑडिटर यांना खुलासा देण्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर या सर्वांचे धाबे दणाणले आहेत.

धनंजय गाडे यांनी २ नोव्हेंबर रोजी पाठविलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, शिवशंकर पतसंस्थेमध्ये अपहार झाल्याची तक्रार झाल्यानंतर विशेष लेखापरीक्षक म्हणून मी परीक्षण करीत आहे. त्यात अपहार व आर्थिक नुकसानीच्या बाबी निदर्शनास आल्याने त्यासंदर्भात आपला खुलासा घेणे आवश्यक आहे. म्हणून ही नोटीस पाठवीत आहे.

संस्थेमधील अनेक कर्जे ही विनातारणी दिसत आहेत. तसेच अपूर्ण कागदपत्रे पाहायला मिळत आहेत. ठेवीदार हितास बाधा आणणारा कारभार व ठेवीदार सभासदांचा विश्वासघात व फसवणूक करणारा कारभार संस्थेत झाल्याचे निदर्शनास येत आहे.

स्वतःच्या आर्थिक लाभाकरिता संस्थेचे आर्थिक नुकसान करून संगनमताने अपहार केल्याचेही दिसून येत आहे. संस्था हिशेबाच्या नोंदवहीत खोट्या नोंदीही दिसत आहेत. वरील अनेक मुद्द्यांसाठी, अपहार रकमेबाबत नुकसानीस आपणास जबाबदार का धरू नये? याचा लेखी खुलासा आपणाकडून येणे आवश्यक आहे. आपल्याला नोटीस मिळाल्यानंतर १४ दिवसांच्या आत आपण आपला खुलासा पुराव्यासहित आमच्याकडे द्यावा. तो दिला नाही तर आपणास हे मान्य आहे, असे गृहीत धरून किंवा दिलेला खुलासा समाधानकारक वाटला नाही तरी आपणावरती पुढील कारवाई करण्यात येईल, असेही यात म्हटले आहे.

खुलाशाकडे ठेवीदारांचे लक्ष

सदरच्या नोटिसा मिळाल्यानंतर संबंधित संचालक, कर्मचारी व त्या-त्या वर्षी लेखापरीक्षण केलेले ऑडिटर यांचे धाबे दणाणले आहेत. ते आता काय खुलासे देणार, याकडे ठेवीदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर