सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी जबरी टिका केली आहे. राजघराण्यानं रयत शिक्षण संस्थेला जागा दिली. पण, ज्यांचे काहीही योगदान नाही, अशा लोकांना रयतमध्ये घेतलं जात आहे. रयत शिक्षण संस्थेचे नाव बदलून पवार शिक्षण संस्था करा, अशी टोलाच उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णा आणि आज्जी छत्रपती सुमित्राराजे हे नेहमी समाजसेवेसाठी कार्यरत होते. आज या संस्थेचा पूर्वीचा हेतू राहिला नाही. रयतमध्ये राजकारण येऊ नये, त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री हे पदसिद्ध असावेत असे ठरले होते. अचानक बदल झाला आणि ‘हे’ त्यात आले. ज्यांचे योगदान नाही त्यांना तुम्ही घेताय. रयत म्हणजे सर्वसामान्यांची संस्था आहे की बारामतीकरांची हे समजत नाही. म्हणूनच, रयतचं नाव बदलून टाका. ज्या कुटुंबाची संख्या जास्त आहे, त्यांचे नाव या संस्थेला द्या असा टोला उदयनराजेंनी शरद पवारांचे नाव न घेता लगावला.
"रयत शिक्षण संस्थेचं नाव आता पवार शिक्षण संस्था करा"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 18:10 IST