लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पावसाळ्यातील दमट हवामानामुळे ओलसरपणा राहिल्याने त्यावर बुरशी येणं हा प्रकृतीचा नियम आहे. पावसाळ्यात कानांना बुरशी, बॅक्टेरियाचा धोका निर्माण झाल्याचे चित्र त्यामुळे आढळून येते. कान ओले राहिल्याने त्यात बुरशी होण्याची शक्यता असल्याने आंघोळ झाल्यानंतर आणि पावसात भिजल्यानंतर कान कोरडे करणे महत्त्वाचे ठरते, असे तज्ज्ञ सांगतात.
कोविडच्या काळामुळे नाकातील काळ्या बुरशीने अनेकांच्या तोेंडचे पाणी पळवले. त्यामुळे कानातील व्यवस्थित स्वच्छता न केल्याने कानात बुरशी वाढते. पावसाळ्यात भिजल्यामुळे, दमट हवेमुळे कानात ओलसरपणा राहतो. कान नीट कोरडे न केल्यास ओलसरपणा कायम राहून त्यावर बुरशी जमा होते किंवा बॅक्टेरियाचा धोका निर्माण होतो. वातावरणात वाढलेली आर्द्रता बॅक्टेरिया आणि बुरशीच्या वाढीसाठी कारणीभूत ठरते. कानातील मळ आणि इयरबड्सच्या वापरामुळे झोली किरकोळ जखमही कानामध्ये संसर्ग होण्याचा धोका वाढवू शकतात.
कानात संसर्ग झाल्यास खाज सुटणे, कानदुखी, ऐकण्याची क्षमता कमी होणे, कानातून पाणी येणे, तीव्र डोकेदुखी आणि ताप यासारखी लक्षणे दिसू शकतात. कानाच्या संसर्गाचा उपचार म्हणजे कान स्वच्छ करणे, राखणे हा आहे, असे वैद्यकीय सांगतात.
उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात कानात बुरशी संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते. सर्व वयोगटातील लोकांमध्ये कानात बुरशी होण्याचा त्रास पाहायला मिळत आहे. या संसर्गामुळे वेळीच निदान व उपचार झाल्यास कान लवकर करा होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात कानाला होणारे मोठे नुकसान टाळता येणे सहज शक्य आहे.
लक्षण :
कान लाल होणे, श्रवणशक्ती कमी होणे, कानाच्या आतील त्वचा खराब होणे, कान दुखणे, जळजळ व सूज येणे. कानाच्या त्वचेला रॅश येणे, कानात तयार झालेला मळ बाहेर न येणे.
उपचार :
रूग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात तपासणी केली जाते. कानात थेंब आणि औषध देऊन उपचार केले जात आहेत.
अशी घ्या काळजी!
कान स्वच्छ करायला अणकुचीदार वस्तू घालू नका
पावसात भिजून घरी आल्यानंतर कान स्वच्छ, कोरडे करा
नियमितपणे हेडफोन वापरत असाल तर साफ करण्यासाठी जंतुनाशक वापरा
कानात कापसाचे बोळे घालण्याची सवय असल्यास ते वारंवार बदलत रहा
कानातील घाण काढण्यासाठी इअर बड्सचा वापर करणे टाळा
थंड पेयाच्या अतिरिक्त सेवनामुळे घशाचा संसर्ग झाल्यास कानावर परिणाम होण्याचा संभव आहे. त्यामुळे कानात जंतुसंसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.
कोट
कोविडच्या उपचारात स्टेरॉईडसचा अतिवापर झाल्यामुळे अनेक रूग्णांची साखर वाढली. नाकात म्युकर वाढते, त्याप्रमाणे कानात बुरशी होण्याची शक्यता पावसाळ्यात अधिक असते. यामुळे खाज सुटणे, जखम होणे, कान दुखणे असे त्रास जाणवतात. मात्र, नाकातील म्युकरप्रमाणे कानातील संसर्ग जीवघेणा नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून रूग्ण बरे होतात.
- डॉ.
पावसाळ्याच्या दिवसांत कानात बुरशी होण्याचे प्रमाण वाढते आणि ही समस्या सर्वसाधारण आहे. कोरोनाशी त्याचा संबंध नाही. कान कोरडे ठेवून, स्वत: स्वच्छता ठेवून काळजी घेता येणे सहज शक्य आहे. त्याचा ताण घेण्याची काहीच गरज नाही
- डॉ. ...