शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
4
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
5
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
6
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
7
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
8
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
9
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
10
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
11
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
12
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
13
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
14
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
15
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
16
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
17
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
18
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
19
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
20
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम

एकेक पत्ता आता होऊ लागला ‘ओपन’

By admin | Published: October 08, 2014 9:12 PM

कऱ्हाड दक्षिणेत रंंगत : अनेकांची भूमिका उघड

प्रमोद सुकरे - कऱ्हाड -पत्त्यांच्या डावाप्रमाणे राजकारणाच्या डावातही सारी पत्त्याची पाने एकाच वेळी ‘ओपन’ करायची नसतात म्हणे! पण निवडणुकीचा प्रचार रंगात आणि अंतिम टप्प्यात आला, की खेळाडूंची चाल सुरू होते़ त्यानंतर एक-एक पत्ते ‘ओपन’ होऊ लागतात़ कऱ्हाडच्या राजकारणातही आता तसेच घडू लागले आहे़कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातील तीनपानी डाव सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे़ यात आमदार विलासराव पाटील-उंडाळकर जुने मुरलेले खेळाडू आहेत़, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या खेळात माहीर आहेत़ नवख्या असणाऱ्या अतुल भोसलेंनीही या डावात इतर दोघांना चांगलाच शह देण्याचा प्रयत्न चालवलाय़ त्यामुळे हा डाव कोण जिंकणार, हे महत्त्वाचे आहे़ प्रमुख प्रतिस्पर्धी असणाऱ्या या तिन्ही खेळाडूंकडून सध्या रोज एक-एक पत्ते ओपन केले जात आहेत़ एखादं पान चांगलं निघालं की मग त्याची चर्चा सर्वत्र होताना दिसतेय़ पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर शहरात जनशक्ती आघाडीचे बहुतांश नगरसेवक आहेत; पण गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीकडून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेत उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव आपल्या गटाच्या नगरसेवकांसह चव्हाण गटाकडे ओपन झाले आणि कार्यकर्त्यांच्यात जोश आला़ हणमंतराव पवार दिसेनात, अशी चर्चा होती; पण मंगळवारी माजी मंत्री सतेज पाटील यांच्या सभेला त्यांनी हजेरी लावली आणि संभ्रम दूर झाला़ भाजपमध्ये प्रवेश केलेले नगरसेवक विक्रम पावसकर उमेदवारी कापल्याने नाराज होते़ त्यानंतर विनोद तावडे यांच्या मलकापूर येथे प्रचारसभेस पत्रिकेवर नाव असतानाही ते अनुपस्थित होते. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या खऱ्या; पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची नुकतीच कऱ्हाडात सभा झाली आणि विक्रम पावसकर यांनी आपले वडील नगरसेवक विनायक पावस्कर यांच्यासह हजेरी लावली़ याशिवाय आ. बाळासाहेब पाटील यांच्या गटाचे जयवंत पाटील व आप्पा माने या नगरसेवकांच्या चेहऱ्यावरही कमळ फुलल्याचे दिसले़ आमदार उंडाळकरांच्या प्रचारात सध्या तरी नगरसेवक प्रमोद कदम एकटेच दिसताहेत़ याशिवाय अनेक माजी नगरसेवकांचाही भाव सध्या वधारलाय़ त्यामुळे उरलेल्या काळात अधिकाधिक पत्ते ओपन होणार, असे दिसते.अन् पत्ता कट झाला मलकापूर नगरपंचायतीत काँग्रेसची एकहाती सत्ता आहे़ पण अतुल भोसलेंच्या भाजपप्रवेशाने नगरसेवकांची पंचाईत झालीय. तरीही काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगरसेवकांच्या हातात कमळ दिसतंय़ नगराध्यक्षा शारदा खिलारेंनीही हातात कमळ घेत विनोद तावडेंच्या सभेला हजेरी लावली़ कारणे काहीही सांगितली जात असली तरी समर्थकात त्यांचा नगराध्यक्षपदाचा पत्ता कट झाला, अशीच चर्चा आहे़ हे पत्ते कधी ओपन होणार?कऱ्हाड नगरपालिकेच्या राजकारणात सर्वांत मोठी लोकशाही आघाडी आहे़ उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे त्याचे नेतृत्व आहे़ पण उत्तरच्या निवडणुकीत व्यस्त असणाऱ्या बाळासाहेबांची दक्षिणच्या लोकशाही आघाडीची भूमिका गुलदस्त्यात आहे़ या आघाडीच्या नगरसेवकांचे पत्ते कधी ओपन होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे़