कऱ्हाड : जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामासाठी हजारो लोकांकडून महाश्रमदान केले जात आहे. सेलिब्रेटी, लोकप्रतिनिधी महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या हातातही खोरं आणि पाटी पाहायला मिळत आहे. मात्र, येथे कामासाठी असणाऱ्या यंत्रसामग्रीला डिझेलची कमतरता पडत आहे. यंत्रसामग्री असूनही केवळ इंधनाअभावी जलसंधारणाच्या कामाला विलंब होताना दिसतोय म्हणूनच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कऱ्हाडच्या यशवंत उद्योग समूहाने ‘एक व्यक्ती, एक लिटर डिझेल’ हे महाअभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
खरंतर कृष्णा-कोयनेच्या काठावरती वसलेल्या कºहाडसारख्या परिसराला पाणी टंचाईच्या झळा तितक्याशा बसत नाहीत. परंतु शेजारच्या अनेक गावांमध्ये वाड्या-वस्त्यांमध्ये पाणी टंचाईची भीषणता जाणवत आहे. अशा परिस्थितीत शासन किंवा अनेक सामाजिक संस्था पाणी टंचाईवर मात करण्यासाठी काही उपक्रमही राबवित आहेत. त्यातील एक महत्त्वाचं उपक्रम म्हणजे श्रमदानातून ‘जलसंधारण.’ सातारा जिल्हा तर जलसंधारणाच्या कामात झपाटलेला दिसतोय.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासन व अनेक सामाजिक संस्थांनी श्रमदानाच्या या कामाला अधिक बळ यावे म्हणून अवजारे, यंत्रसामग्री पुरविण्याचे काम करीत आहेत. मात्र, या यंत्रसामग्रीला लागणारे इंधन कमी पडते की काय? अशी परिस्थिती आहे. त्यामुळे यंत्रसामग्री असूनही इंधनाअभावी जलसंधारणाच्या कामाला विलंब होऊ नये, यासाठी कºहाडच्या यशवंत उद्योग समूहाने ‘एक व्यक्ती, एक लिटर डिझेल’ हे महाअभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामध्ये सहभागी होणाºया व्यक्तीकडून एक लिटर डिझेलचे पैसे देणगी स्वरुपात स्विकारले जाणार असून, जमा झालेली रक्कम दुष्काळग्रस्त भाग पाणीदार बनविण्यासाठी वापरली जाणार आहे.दुष्काळग्रस्त भागात श्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मी देखील बºयाच कामांना भेटी दिल्या. काही ठिकाणी सहभागीही झालो. त्या ठिकाणी इंधनाचा प्रश्न माझ्या लक्षात आला आणि त्यावर उपाय म्हणून आम्ही आमच्या उद्योग समूहाच्या माध्यमातून एक व्यक्ती, एक लिटर डिझेल महाअभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, कऱ्हाडकर त्याला चांगला प्रतिसाद देतील, असा मला विश्वास आहे.- शेखर चरेगावकर, संस्थापक, यशवंत उद्योग समूह, कऱ्हाडउपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकार परिषद