शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोरोना बाधितांचा आकडा आठ हजारांवर, नवे ३९२ रुग्ण निष्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 2:54 PM

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच दिवसभरात नवीन ३९२ रुग्ण निष्पन्न झाले. त्यामुळे बाधितांचा आकडा ८२७५ वर पोहोचला. तर ११ जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्याही वाढून २६० झाली.

ठळक मुद्देकोरोना बाधितांचा आकडा आठ हजारांवर, नवे ३९२ रुग्ण निष्पन्न ११ जणांचा मृत्यू; बळींची संख्या २६०, २२६ जणांना सोडले घरी

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच दिवसभरात नवीन ३९२ रुग्ण निष्पन्न झाले. त्यामुळे बाधितांचा आकडा ८२७५ वर पोहोचला. तर ११ जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्याही वाढून २६० झाली. दरम्यान, कोरोनावर मात केल्याने २२६ जणांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत ४४४९ नागरिक बरे झाले आहेत. तर ७४३ नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित तसेच मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडा वाढतच चालला आहे. सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार २९० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर मंगळवारी दिवसभरात ३९२ कोरोना बाधित आढळले आहेत.सोमवारी रात्रीच्या अहवालानुसार फलटण तालुक्यात २८ रुग्ण आढळले. फलटण शहराबरोबरच मलटण, मांडवखडक, विडणी, लक्ष्मीनगर, कोळकी, तरडगाव, तावडी, तामखाडा, जिंती, निंभोरे, गिरवी आदी गावांत हे रुग्ण आढळून आले. तर वाई तालुक्यात शहराबरोबरच कवठे, उडतारे, पांढऱ्याचीवाडी, बावधन, पाचवड, शेंदूरजणे, धोम कॉलनी, ओझर्डे कदमवाडी आदी ठिकाणी मिळून २६ नवीन रुग्ण सापडले.

सातारा तालुक्यातही नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली. सातारा शहरातील दौलतनगर, कामाठीपुरा, शाहूनगर, भवानी पेठ, तामजाईनगर, विलासपूर, शनिवार पेठ, गुरूवार पेठ, सोमवार पेठ, गोडोली आदींबरोबरच तालुक्यातील वळसे, खेड, नेले-किडगाव आदी ठिकाणी रुग्ण आढळून आले. अतित येथे तर १५ रुग्ण निष्पन्न झाले आहेत.कºहाड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळले. यामध्ये कºहाड शहराबरोबरच मलकापूरमध्ये संख्या अधिक आहे. सैदापूर, रेठरे कारखाना, आगाशिवनगर, नांदलापूर, गोटे, आटके, वडगाव, काले, विरवडे, उंब्रज, तळबीड, चरेगाव, गोवारे, मालखेड, मसूर, चोरे, वाघेरी, कापील, साकुर्डी, कार्वे, टाळगाव, गोळेश्वर आदी गावांतही रुग्ण आढळले. पाटण तालुक्यातील कालगाव, पाटण, पंचमोरगिरी, दिवशी बुद्रुक आदी गावांत कोरोना रुग्ण स्पष्ट झाले.

महाबळेश्वर तालुक्यात एका नवीन रुग्णाची नोंद झाली. तर कोरेगाव तालुक्यातील ५ रुग्ण आढळले. कोरेगाव, विखळे, नायगाव, कोरेगाव तहसील कार्यालय व रहिमतपूर येथील हे रुग्ण आहेत.खटाव तालुक्यात १६ रुग्ण आढळले. यामध्ये विसापूर, मोराळे, वडूज, वांझोळी, खटाव, तडवळे, उंबर्डे, मायणी, राजाचे कुर्ले येथील रुग्णांचा समावेश आहे. माण तालुक्यात म्हसवड आणि मासाईवाडी येथे मिळून ४ रुग्ण आढळून आले. जावळी तालुक्यात नवीन १६ रुग्ण निष्पन्न झाले.

यामधील १२ हे मोरघर येथील असून उर्वरित रुग्ण हे सरताळे, मेढा, गांजे येथील आहेत. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील म्हणजे चव्हाणवाडी-आष्टा (सांगली) येथील १, रिळे, ता. शिराळा १ आणि किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा येथील एका रुग्णाचा समावेश आहे.सातारा तालुक्यातील चौघे मृत...जिल्ह्यात कोरोना बाधित ११ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सातारा तालुक्यातील सर्वाधिक चौघेजण मृत झाले आहेत. तर महाबळेश्वरमधील दोघांचा समावेश आहे. दरम्यान, साताऱ्यातील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात सरताळे, ता. जावळी येथील ५६ वर्षीय महिला, कऱ्हाड शहरातील ४८ वर्षीय महिला, गोडोली (सातारा) येथील ७२ वर्षांचा पुरुष, सातारा तालुक्यातील नेलेमधील ७५ वर्षीय महिला, फलटण येथील ६० वर्षीय महिला आणि राजेवाडी निगडी, ता. सातारा येथील ७० वर्षांचा वृध्द अशा सहा बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचबरोबर कऱ्हाडमधील खासगी रुग्णालयात पाटण येथील ६९ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

वाई येथील एका खासगी रुग्णालयात महाबळेश्वरच्या ८० वर्षीय पुरुष व साताऱ्यातीलही खासगी रुग्णालयात महाबळेश्वरमधीलच ५१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. सातारा शहरातील गुरुवार पेठमधील ७६ वर्षीय पुरुष आणि कोरेगाव तालुक्यातील गिगेवाडी येथील ६४ वर्षीय पुरुष अशा पाच कोरोना बाधितांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर