शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

Corona vaccine In Satara : जिल्ह्यातील लसीकरण नागरिक संख्या ७ लाखांच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:00 PM

Corona vaccine In Satara : सातारा जिल्ह्याला कोरोना लस मिळण्याचे प्रमाण कमी असल्याने मोहीम अडखळतच सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ६ लाख ९३ हजार नागरिकांनाच पहिला डोस मिळालेला आहे. लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यास मोहिमेला वेग येणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील लसीकरण नागरिक संख्या ७ लाखांच्या उंबरठ्यावर.. मोहीम अडखळतच सुरू : कोरोना लस उपलब्ध होण्याचे प्रमाण कमी

सातारा : जिल्ह्याला कोरोना लस मिळण्याचे प्रमाण कमी असल्याने मोहीम अडखळतच सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ६ लाख ९३ हजार नागरिकांनाच पहिला डोस मिळालेला आहे. लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यास मोहिमेला वेग येणार आहे.जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४५ ते ५९ वर्षांतील कोमॉर्बिड नागरिकांना कोरोना लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस मिळू लागली. त्यासाठी शासकीय आरोग्य केंद्रे आणि खासगी काही रुग्णालयात ही सुविधा सुरु झाली. तर शासकीय केंद्रात मोफत लस देण्यात येत आहे.एक मे पासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येऊ लागली. मात्र, लस उपलब्ध होत नसल्याने ही मोहीम स्थगित करण्यात आली आहे. आता फक्त ४५ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचे ठरविण्यात आले आहे. सध्या जिल्ह्याला लस उपलब्ध होईल त्याप्रमाणात मोहीम सुरू आहे. त्यासाठी जिल्ह्यात ४४० हून केंद्रात ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी रोटेशनप्रमाणे नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. त्यामुळे दररोज काही केंद्रेच सुरू असतात.जिल्ह्याला मागील काही दिवसांत अवघ्या तीनवेळाच लस मिळालेली आहे. पण, मिळालेल्या डोसची संख्याही कमी आहे. त्यामुळे लसीकरणात खंड पडत आहे. काही केंद्रे तर अनेक दिवस बंद असतात. यामुळे दूरवरच्या नागरिकांना हेलपाटा बसत आहे. जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. तरच लसीकरण मोहीम वेग घेऊ शकते.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसSatara areaसातारा परिसर