सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या बळींची संख्या घटत असून, गुरूवारी ५ जणांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा १ हजार ५८५ वर पोहचला आहे. महिनाभरापूर्वी दिवसाला २० ते २४ जणांचा मृत्यू होत होता. मात्र हे प्रमाण आता कमी होत चालले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात बुधवारी रात्री २३५ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. त्यामध्ये ५ बाधितांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पिंपळवाडी, (ता. सातारा) येथील ७० वर्षीय महिला, अपशिंगे, (ता. सातारा) येथील ७० वर्षीय पुरुष, देगाव, (ता. सातारा) येथील ६५ वर्षीय महिला तसेच पाडळी, (ता. सातारा) येथील ७२ वर्षीय पुरुष, नाईकबोमवाडी, (ता. फलटण) येथील ५६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.दरम्यान, जिल्ह्यात कोरोना मुक्तीचेही प्रमाण आणखीनच वाढले असून, आतापर्यंत ४३ हजार १०४ नागरिकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तसेच कोरोना बाधितांची संख्या ४७ हजार ४०४ वर पोहचली आहे.
सातारा जिल्ह्यात बळींची संख्या घटतेय; पाच जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2020 2:27 PM
CoronaVirus, ratnagirinews सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या बळींची संख्या घटत असून, गुरूवारी ५ जणांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा १ हजार ५८५ वर पोहचला आहे. महिनाभरापूर्वी दिवसाला २० ते २४ जणांचा मृत्यू होत होता. मात्र हे प्रमाण आता कमी होत चालले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.
ठळक मुद्देसातारा जिल्ह्यात बळींची संख्या घटतेय; पाच जणांचा मृत्यूकोरोना मुक्तीचेही प्रमाण आणखीनच वाढले