राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडून राज्यातील ६६७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या सहा महिन्यांच्या काळात ‘माझी वसुंधरा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात पृथ्वी, वायु, जल, अग्नी व आकाश या पंचतत्वाच्या संवर्धनासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. नैसर्गिक जीवनपद्धतीचा अवलंब करून पर्यावरणाचे व निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न करावा, म्हणून या अभियानात पालिका विविध उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून १ जानेवारीला पालिकेची लक्ष्मीनगर बहुउद्देशीय इमारत, घनकचरा प्रकल्प युनिट १ व २, झेडपी कॉलनी आगाशिवनगर, पाणीपुरवठा विभाग, प्रायमुव्ह इन्फ्रास्ट्रक्चर अॅण्ड डेव्हलपमेंट कार्यालय या सात ठिकाणी एकाचवेळी अक्षयऊर्जा स्त्रोत प्रोत्साहनासह हरित शहराची शपथ घेण्यात आली.
यावेळी पालिकेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी वसुंधरा संवर्धनासाठी वृक्षलागवड, संगोपन, सौरऊर्जेचा वापर करून प्रदूषण मुक्त शहराचा निर्धार केला. यावेळी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी नवीन वर्षात नागरिकांच्या हिताचे उपक्रम यशस्विपणे राबविण्यासाठी सदैव सतर्क राहण्याचे कर्मचाऱ्यांना आवाहन केले. मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांनी प्रशासन व नागरिकांच्या सहकार्यातून उत्कृष्ट पद्धतीने काम करण्याच्या सूचना दिल्या.
सभापती राजेंद्र यादव, प्रशांत चांदे, शकुंतला शिंगण, स्वाती तुपे, नगरसेविका आनंदी शिंदे, नंदा भोसले, गीतांजली पाटील, अलका जगदाळे, कमल कुराडे, भारती पाटील, पूजा चव्हाण, माधुरी पवार, नूरजहान मुल्ला, नगरसेवक कृष्णत येडगे, सागर जाधव, आनंदराव सुतार, धन्वंतरी साळुंखे, नोडल अधिकारी मनिषा फडतरे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, स्वच्छ सर्वेक्षण शहर समन्वयक उपस्थित होते.
- कोट
नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अभियानात लोकसहभागातून नागरिकांच्या हितासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे. यासाठी पालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचारी व नागरिकांनी एकजुटीने काम करावे.
नीलम येडगे, नगराध्यक्षा
फोटो : ०३केआरडी०२
कॅप्शन : मलकापूर (ता. कऱ्हाड) येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत हरित शहराची शपथ घेण्यात आली.