सातारा : आमदार-खासदारांचा शपथविधी सगळ्यांनाच ज्ञात आहे. मात्र, निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा शपथविधी कोणी ऐकला किंवा पाहिला नव्हता. सातारा तालुक्यातील जकातवाडी या पुरोगामी गावात मात्र सदस्यांचा शपथविधी झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ देऊन हे गाव दत्तक घेत असल्याचे जाहीर केले.सातारा तालुक्यातील जकातवाडी येथील ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. निवडणूक झाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्यत्वाचे प्रमाणपत्र सदस्यांना वितरित केले जाते. मात्र, हे कोणत्याही राजकीय नेत्याकडून न घेता प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांकडून स्वीकारण्याचा मानस नवनिर्वाचित सरपंच चंद्रकांत सणस यांनी सर्वांसमोर व्यक्त केला. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, गटविकास अधिकारी अमिता गावडे, विस्तार अधिकारी झोरे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना पदाची शपथ दिली. या अनोख्या उपक्रमांमुळे सदस्यांमध्ये उत्साह संचारला आहे.कैलास श्ािंदे म्हणाले, ‘लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुकांची गरज आहे.; पण निवडणुका संपल्यानंतर ग्रामस्थ व पदाधिकाºयांनी गावच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येणे आवश्यक आहे. जकातवाडीमध्ये ही एकी दिसली. राजकारणानंतरही दोन्ही पॅनेलचे नवनिर्वाचित सदस्य एकत्र येऊन कार्यक्रम घेतात, हे कौतुकास्पद आहे.निवडून आलेल्या प्रत्येक सदस्याला गावच्या विकासाची आस आहे. म्हणून हे गाव दत्तक घेऊन या गावच्या विकासासाठी आवश्यक ती सर्व मदत करणार आहे.’यावेळी सरपंच चंद्रकांत सणस, उपसरपंच हणमंत भोसले, उत्तम सणस, शंकर दळवी, विनायक मोहिते, सखुबाई देशमुख, बिस्मिल्ला शेख, सोनाली शिंदे, सुजाता माने, संगीता शेळके यांनी शपथ घेतली. यावेळी जितेंद्र जाणवळे, गणेश चव्हाण, राजश्री कांबळे, तृप्ती यादव, प्रल्हाद भोसले, रामचंद्र शिंदे, मनोहर चव्हाण, तानाजी जाधव, मनोहर जाधव, डॉ. सचिन भोसले, योगेश शिंदे, सचिन जाधव, विजय पडवळ, विशाल पोगडे, जनार्दन भोसले, दीपक देशमुख, राजेंद्र सुतार, निरंजन फडणीस, विक्रम सावंत, इनामदार चाचा, ग्रामसेवक धुमाळ आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्यांचा शपथविधी थाटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:46 PM