शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

ऑक्टोबर हिटचा तडाखा; साताऱ्याचा पारा ३५ अंशाजवळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 12:13 PM

पाऊस गेल्याने बसू लागले उन्हाचे चटके

सातारा : जिल्ह्यात परतीचा पाऊस अपेक्षित न पडल्याने उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. त्यामुळे सातारा शहराचा पाराही ३५ अंशाजवळ जात असल्याने दुपारच्या सुमारास उन्हाचे चटके चांगलेच जाणवत आहेत. या ऑक्टोबर हिटमुळे नागरिकांना सर्दी, ताप, थंडीसारखे आजार होऊ लागले आहेत.जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत मान्सूनचा पाऊस पडतो. तर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत तरी परतीचा पाऊस होत असतो. यंदा मात्र, मान्सूनचा पाऊस कमी झाला. तर परतीचा पाऊसही रुसला. त्यामुळे यंदा आठ दिवस अगोदर परतीच्या पावसाने जिल्ह्यातून काढता पाय घेतला आहे. परिणामी आकाश स्वच्छ राहत असल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे. मागील काही दिवसांत तर सातारा शहराचा पारा कायम ३० अंशावर राहिला आहे. तर काही दिवस तो ३३ ते ३५ अंशादरम्यान होता. यामुळे दुपारच्या सुमारास सूर्य तळपत असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे.पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यात कमाल तापमानात मोठी वाढ झालेली आहे. यामुळे जमिनीचा ओलावा कमी होत चालला आहे. तर दुपारच्या उन्हाने शेतकरी तसेच मजूर घामाघूम होत आहेत. सध्या शेतकरी खरीप हंगामातील पिकांची काढणी आणि रब्बीच्या दृष्टीने पेरणीची तयारी करत आहेत. पण, ऑक्टोबर महिना सुरू झाल्यापासून त्यांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. त्यातच ढगाळ वातावरणही तयार होत नाही. यामुळे ऑक्टोबर हिटमध्येच त्यांना शेतीची कामे उरकावी लागत असल्याचे चित्र आहे.त्याचबरोबर आगामी काळात आणखी ऊन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा पारा ३५ अंशाचा टप्पा पार करण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यातच पावसाळा संपल्याने वातावरणात बदल झाला आहे. यामुळे सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढू लागले आहेत. दवाखान्यात रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.

सातारा शहरात नोंद कमाल तापमान..दि. १ ऑक्टोबर २५.०६,  २ ऑक्टोबर २५.५,  ३ ऑक्टोबर ३१.४,  ४ ऑक्टोबर ३२.५,  ५ ऑक्टोबर ३२.६,  ६ ऑक्टोबर ३३.७,  ७ ऑक्टोबर ३३.४,  ८ ऑक्टोबर ३३.७,  ९ ऑक्टोबर ३४.५,  १० ऑक्टोबर ३३.७,  ११ ऑक्टोबर ३२.८ आणि  १२ ऑक्टोबर ३३.४

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTemperatureतापमान