फलटण : फलटण नगर परिषदेमध्ये कार्यरत असणारे नगर परिषदेचे कर्मचारी संतोष फरांदे यांच्यावर फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी दिली.
१४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पीडित महिला पायी चालत जात असताना बारामती पूल येथे संतोष फरांदे याने आवाज दिल्याने पीडित महिला थांबल्या असता ‘तू मला आवडतेस, मी तुला आवडतो का?, तुला कशाची आठवण होत नाही का?,’ असे म्हणत वाईट हेतूने पीडित महिलेचा हात पकडला. त्या वेळी पीडित महिलेची चुलती पाठीमागून आली व तिने संतोष फरांदे याची कॉलर पकडली असता संतोष फरांदेने पीडितेचा हात सोडून गाडीवरून पळून गेला.
या घटनेची फिर्याद संबंधित महिलेने फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास फलटण पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे करीत आहेत.