नितीन काळेल ।सातारा : ‘घार हिंडते आकाशी; चित्त तिचे पिलापाशी’ असे म्हटले जाते, याचाच प्रत्यय आता माण तालुक्यात येत आहे. कारण सध्या वॉटर कप स्पर्धेंतर्गत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून, राज्यात विविध ठिकाणी कार्यरत असणारे अधिकारी मायभूमी पाणीदार करण्यासाठी सुटी, रजा काढून गावाला येत आहेत.
सध्या तालुक्यातील डझनावर अधिकारी गावी श्रमदानात गुंतले आहेत. यामुळे ग्रामस्थांना मार्गदर्शन मिळून त्यांचा उत्साहही वाढला आहे. राज्यात गेल्या तीन वर्षांपासून अभिनेता अमीर खानच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू आहे. सुरुवातीच्या दोन वर्षांत स्पर्धेला प्रतिसाद कमी मिळाला; पण दोन्हीही वर्षी सातारा जिल्ह्याने राज्यात डंका वाजवला. त्याचबरोबर या कामातून अनेक गावे पिण्याच्या पाण्याबाबत टंचाईमुक्त झाली. याच गावांचा आदर्श आज जिल्ह्यातील इतर दुष्काळी गावांपुढे आहे. त्यामुळे तिसऱ्या वर्षीच्या स्पर्धेत जिल्ह्यातील माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यांतील १६० च्यावर गावे सहभागी झाली आहेत. त्यातील १४५ गावे ही श्रमदानात आघाडीवर आहेत. तर माण तालुक्यातील ४७ गावे श्रमदानात पुढे आहेत.
माण तालुक्यात सर्वाधिक दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे पाण्याचे महत्त्व येथील लोकांना प्रथमपासूनच कळले आहे. आता गावे पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थ झटू लागले आहेत. उन्हाची पर्वा न करता काम सुरू आहे. प्रसंगी रात्रीही कामे उरकण्यात येत आहेत. त्यासाठी माण तालुक्यातील अधिकाºयांचाही मोठा हातभार लागत आहे. मूळ माण तालुक्यातील पण, नोकरीनिमित्त राज्यात कार्यरत असणारे हे अधिकारी वॉटर कप स्पर्धा सुरू होण्यापूर्वीपासून ग्रामस्थांसाठी मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे माण तालुक्यातील वॉटर कपच्या स्पर्धेत उत्साह जाणवत आहे. गावोगावी श्रमदान सुरू असून, येणाºया पावसाळ्यात या जलसंधारणाचे दृश्यरूप सर्वांनाच दिसून येणार आहे.
दरम्यान, मुंबई येथे आयकर विभागात अप्पर आयुक्त असणारे डॉ. नितीन वाघमोडे हे बनगरवाडी (वरकुटे मलवडी) या आपल्या गावी श्रमदान करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच या गावाने यापूर्वीही एक पाझर तलाव शासकीय मदतीशिवाय पूर्ण केला. तसेच बंधाºयातील गाळ काढण्याचे काम, ओढा रुंदीकरण केले. त्याचा फायदा या गावाला आजही होत आहे. या गावाची एकी आज सर्वांसाठी आदर्शवत ठरली आहे. कुकुडवाड येथील नामदेव भोसले हे तर श्रमदानात आघाडीवर आहेत. मंत्रालयात अधिकारी असले तरी गावी लोकांबरोबर पाटी उचलणे, दगड फोडणे आदी कामे करत आहेत. तसेच तालुक्यातील इतर अधिकारीही श्रमदान करीत आहेत.बुद्धीच्या सुकाळामुळेच पाणी चळवळ...माण तालुक्यात दुष्काळ असलातरी बुद्धीचा सुकाळ आहे, असे म्हटले जाते. याला कारण म्हणजे येथील अधिकारी. तालुक्यातील या भूमिपुत्रांनी प्रशासनात जसा ठसा उमटविला तसाच आता दुष्काळ पुसण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. कोकण विभागाचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख आजही सेवानिवृत्तीनंतर गावोगावी जाऊन श्रमदानाला भेट देऊन मार्गदर्शन करत आहेत. असे अनेक अधिकारी तालुक्यासाठी प्रेरणादूत ठरले आहेत.माहेरासाठी आयुक्त धायगुडे यांची धडपडमालेगाव महानगरपालिकेच्या संगीता धायगुडे या आयुक्त आहेत. त्यांचे माहेर माण तालुक्यातील आंधळी तर सासर खंडाळा तालुक्यात आहे. वॉटर कप स्पर्धा सुरू झाल्यापासून त्यांनी माहेरची गावे म्हणून माण तालुक्यात येऊन श्रमदान व मार्गदर्शन केले आहे. तसेच त्यांच्या माध्यमातून मशिनरी, निधी मिळाला आहे. त्यामुळे आंधळीसह परिसरात श्रमदान व यंत्राद्वारे कामे वेगाने होत आहेत.
-डॉ. नितीन वाघमोडे,अप्पर आयुक्त आयकर विभाग(रा. वरकुटे मलवडी, बनगरवाडी)संगीता धायगुडे, आयुक्त मालेगाव महानगरपालिका (रा. आंधळी)प्रवीण इंगवले,आयपीएस अधिकारी (रा. बिदाल)नामदेव भोसले, मंत्रालय उपसचिव उद्योग विभाग (रा. कुकुडवाड)महेश शिंगटे, उपायुक्त आयकर विभाग (रा. वाघमोडेवाडी)राजेश काटकर, उपजिल्हाधिकारी, मंत्रालय (रा. वडजल)गजानन ठोंबरे, आरटीओ ठाणे(रा. बिदाल)अजित काटकर, कक्षअधिकारी मंत्रालय कृषी विभाग (रा. कुकुडवाड)सुरेखा माने, तहसीलदार माण(मूळ रा. काळचौंडी)अमोल कदम, नायब तहसीलदार वर्धा जिल्हा (रा. परकंदी)स्वप्नील माने, अधिकारी पनवेल(रा. बिदाल)माण तालुक्यातील अधिकारी जलसंधारणासाठी श्रमदान करत आहेत. कुकुडवाड येथे नामदेव भोसले तर बनगरवाडीत नितीन वाघमोडे हे काम करत आहेत.