पुसेगाव : हरियाणा राज्यातील २५ उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खटाव तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या निढळ गावास भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. तसेच विकासात्मक कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
हरियाणा मंत्रालयातील उपसचिव, सहसचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सहसंचालक तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांचा या अभ्यास दौºयातील पथकात समावेश आहे. यशदा या महाराष्ट्र राज्याच्या शिखर प्रशिक्षण संस्थेत या अधिकाºयांचे प्रशिक्षण सुरू असून, प्रशिक्षणाचा भाग म्हणून यशदाने निढळ गावाचा अभ्यास दौरा आयोजित केला होता.
या उच्चपदस्थ अधिकाºयांनी ह्यग्रामीण खेड्यांचा विकासह्ण अभ्यासक्रमांतर्गत निढळची पाहणी केली. त्यांचे हनुमान विद्यालय निढळ येथे गावकºयांच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना गावाची तसेच ग्राम विकास समिती व नोकरवर्ग संघटनेची बांधणी करून ग्रामस्थांना एकत्र करून गावाचा सर्वांगीण विकास कसा साध्य केला, याची माहिती देण्यात आली.
गावची प्रत्यक्षरीत्या पाहणी करण्यात आली. यावेळी पाण्याचा योग्य नियोजन वॉटर शेड प्रकल्प, पाणलोट क्षेत्रात जलसंधारणाची झालेली दर्जेदार काम बघून अधिकारी भारावून गेले. त्यानंतर गावातील ग्रामपंचायत कार्यालय व विविध कार्यकारी सोसायटी या दोन्ही कार्यालयांच्या इमारती पाहून अधिका-यांनी कौतुक केले. नीलकंठेश्वर सहकारी पतसंस्था, महिला बचत भवन, तसेच महादेव मंदिराच्या परिसरात असलेल सुसज्ज असे उद्यान पाहून उपस्थित अधिकारी खूप आनंदी झाले. तुमच्या या सर्वांच्या कर्तृत्वाने आम्ही भारावून गेलो आहे, असे मतदेखील उपस्थित अधिकाºयांनी व्यक्त केले.