शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

उच्चपदस्थ अधिकारी रमले पुस्तकांच्या गावा!, सातारच्या 'भिलार'ची राज्यातील अधिकाऱ्यांना भुरळ

By प्रगती पाटील | Published: December 07, 2023 12:34 PM

सातारा : नोंदणी महानिरीक्षक विभागाचे (आयजीआर) राज्यातील १४ मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निबंधक आणि शालेय शिक्षण विभागाचे राज्यातील १७ ...

सातारा : नोंदणी महानिरीक्षक विभागाचे (आयजीआर) राज्यातील १४ मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निबंधक आणि शालेय शिक्षण विभागाचे राज्यातील १७ शिक्षण उपसंचालक यांना पुस्तकाच्या गावाने अक्षरशः भुरळ घातली. हे उच्चपदस्थ अधिकारी दिवसभर या गावी रमले.महाबळेश्वर तालुक्यातील भिलार २०१७ पासून पुस्तकाचे गाव म्हणून राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने घोषित केले आहे. हे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव असून शासनाचा पुढाकार आणि गावाचा सहभाग याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. येथे बालसाहित्य, स्पर्धा परीक्षा, कादंबरी, कविता, मराठी भाषा व संस्कृती, विज्ञान नियतकालिके, चरित्रे, इतिहास, स्री साहित्य, कथा, लोकसाहित्य, परिवर्तन चळवळ आदि ३५ साहित्य प्रकारानुसार घरे, लॉजेस शाळा व मंदिरामध्ये वाचनासाठी पुस्तके विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) या राज्य शासनाच्या शिखर संस्थेत या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. सत्रसंचालिका म्हणून डॉ. अनिता महिरास व अक्षय बनसोडे काम पाहत आहेत. नोंदणी महानिरीक्षक विभागातील गजानन वाखडे, के. आर. दवंगे, विजय भालेराव, किशोरकुमार मगर, हेमलता जगताप, संतोष हिंगाणे, गोविंद गीते, श्रीकांत सोनवणे, के. एस. कांबळे, सुनील पाटील, अशोक आटोळे, आर. जी. जानकर, आर. टी. नाईक,

प्रकाश खोमणे आणि शालेय शिक्षण विभागातील श्रीराम पानझाडे, हारून आतार, वंदना वाहूळ, राजेश क्षीरसागर, रमाकांत काटमोरे, अनुराधा ओक, औदुंबर उकिरडे, डॉ. सुभाष बोरसे, वैशाली जामदार, सुधाकर तेलंग, चिंतामण वंजारी, संदीप संगवे, राजेंद्र अहिरे, अनिल साबळे, शिवलिंग पटवे, निशादेवी वाघमोडे, माधुरी सावरकर हे सर्व वर्ग एकचे अधिकारी राज्यातील विविध जिल्ह्यातून भिलार मध्ये आले होते.

हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यश नितीन भिलारे, संचालिका तेजस्विनी जतीन भिलारे, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, महेश ननावरे, संगीता शिंदे, अर्चना गाडेकर, अमोल आंब्राले व पुस्तकाचे गाव प्रकल्प अधिकारी बालाजी हाळदे, राजेश जाधव, उमा शिंदे, संतोष भिलारे, प्रमोद पवार यांनी स्वागत करून प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. दरम्यान या चमूने वाई येथील दुय्यम निबंधक कार्यालयास भेट देऊन माहिती घेतली. यावेळी विजय जगताप यांनी स्वागत केले.

सन २०१८ मध्ये साताऱ्यात झालेल्या ऐतिहासिक राज्य शिक्षक पुरस्कार सोहळ्यावेळी सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांची भिलारला व्यवस्था केली होती, शिवाय त्यानंतर अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन भिलारला झाले होते, या दोन्ही बाबी संस्मरणीय आहेत. आमच्यातल्या अनेक सहकाऱ्यांनी सहकुटुंब पुस्तकांच्या मेजवानीस पुन्हा येण्याचा संकल्प केला आहे. -राजेश क्षीरसागर, शिक्षण उपसंचालक पुणे

टॅग्स :Satara areaसातारा परिसर