क-हाड : क-हाड पंचायत समितीची गुरुवारी मासिक सभा पार पडली. या सभेत आरोग्य, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन, शेती आदी विभाग वगळता इतर विभागांतील अधिकाºयांनी तर काही सदस्यांनीही दांडी मारली. त्यामुळे मोजक्याच सदस्यांच्या उपस्थितीत सभापती, गटविकास अधिकाºयांनी आढावा घेतला. तर सुपने प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका-यांच्या मनमानी कारभारामुळे सदस्यांनी तालुका आरोग्य अधिका-यांना धारेवर धरले.
क-हाड पंचायत समितीची मासिक सभा गुरुवारी पंचायत समितीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानी सभापती फरिदा इनामदार होत्या. तर गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, उपसभापती सुहास बोराटे उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत विभाग, पशुसंवर्धन, शेती व आरोग्य विभागातील अधिकाºयांनी आपापल्या विभागाचा आढावा सादर केला. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख या आढावा सादर केला. दरम्यान, त्यांना सदस्या सुरेखा पाटील यांनी सुपने प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर यांच्या मनमानी कारभारावरून चांगलेच धारेवर धरले. सुपने प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी महिला रुग्ण घेतले जात नाहीत. याबाबत जाब विचारण्यास गेल्यास कोणालाही कारवाई करायला सांगा, आम्ही घाबरत नाही, असे सांगितले जाते. सुपने प्राथमिक आरोग्य केंद्रांवर १९ गावांचा भार आहे. १९ गावांतून रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येतात. मात्र, त्यांच्या उपचाराबाबत हलगर्जीपणा केला जात असल्याची तक्रार सदस्या पाटील यांनी यावेळी केली.
वरिष्ठ अधिकाºयांकडून कारवाई होत नसेल तर गावपातळीवर आम्ही कारवाई करू, असा इशारा यावेळी सदस्या पाटील यांनी दिला. यावर उपसभापती सुहास बोराटे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना काम जमत नसेल तर त्यांना गडचिरोलीला पाटवावे, तसा ठरावही आम्ही देऊ, असे सांगितले.यावेळी ग्रामपंचायत विभागातील अधिका-यांवर तसेच पशुसंवर्धन विभागातील अधिकाºयांवर सदस्यांनी प्रलंबित कामांमुळे ताशेरे ओढले. यावेळी पार पडलेल्या सभेस सदस्यांनीही निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीमुळे गैरहजर राहिले होते.गैरहजर अधिका-यांबाबत तीव्र संतापवर्षातील बारा महिन्यांमध्ये चालणाºया कºहाड पंचायत समितीच्या प्रत्येक मासिक सभेत सदस्यांकडून शासकीय अधिकारी धारेवर धरले जात असतात. या प्रकारामुळे की काय अधिकाºयांकडून महिन्यातून एकदा घेत असलेल्या मासिक सभेलाच गैरहजेरी लावली जात आहे. दांडीबहाद्दर अधिकारी सभेला हजेरी लावणार नसल्याने सदस्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.