सातारा : जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटता तुटेनासी झाली आहे. गत दोन महिन्यांपासून जिल्हा प्रशासन आटोकाट प्रयत्न करत असताना कोरोना बाधितांचा आकडा वाढतच आहे. शुक्रवारी आणखी १८ जण कोरोना बाधित आढळून आले तर मृत्यू पश्चात एका वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्याचा आकडा ५९६ वर तर बळींचा २५ वर पोहोचला आहे.जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढले. तेव्हापासून आजतागायत ही कोरोनाची साखळी न तुटता वाढतच चालली आहे. शुक्रवारी सकाळीही आणखी १८ जण पॉझिटिव्ह आढळून आले. तर खटाव तालुक्यातील गुरसाळे गावठाण येथील ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू पश्चात अहवाल पॉझिटिव्ह आला.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या खंडाळा तालुक्यातील अर्बन सिटी धनगरवाडी ५० वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील समर्थनगर, सातारा येथील १९ वर्षीय युवक, करंडी येथील २५ वर्षीय महिला, कऱ्हाड तालुक्यातील वानरवाडी येथील ७० वर्षीय महिला, १७ वर्षीय युवती, फलटण तालुक्यातील जोरगाव येथील २५ वर्षीय महिला, २१ वर्षीय युवक, १२ वर्षांचा मुलगा, कोळकी येथील २५ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, जावळी तालुक्यातील प्रभूचीवाडी येथील ५२ वर्षीय पुरुष, कावडी येथील १५ वर्षाचा मुलगा, ५८ वर्षीय पुरुष, ४७ वर्षीय पुरुष, १८ वर्षीय युवक, माण तालुक्यातील वडजल येथील ५५ वर्षीय पुरुष अशी तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या आहे.दरम्यान, पुणे येथून १७५ जणांचे रिपोर्टही निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्च चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. जिल्ह्यात आत्तापर्यंत ५९७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, २५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २५ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३१८ कोरोना बाधितांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.