फोटो जगदीश कोष्टी यांनी मेल केला आहे.
०००००००००
गाड्याची डागडुजी
सातारा : राज्य शासनाने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या आगारातच उभ्या आहेत. दिवसभरातून एखादीच गाडी बाहेर पडत असते. त्यामुळे कर्मचारी गाड्यांची डागडुजी करण्यात व्यस्त आहेत. पावसाळ्यापूर्वीची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत.
=========
मंदिरेही लॉकडाऊन
सातारा : सातारा जिल्ह्यातील सज्जनगड, शिखर शिंगणापूर येथे उन्हाळ्यात मोठ्या संख्येने भाविक राज्यभरातून येत असतात. सध्या मात्र लॉकडाऊन असल्याने देऊळ बंद आहेत. त्यामुळे भाविकांनाही येथे येता येत नाही. याचा फटका देवस्थान ठिकाणच्या लहान-मोठ्या व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे कधी कोरोनाचे संकट दूर होते, याकडे लक्ष लागले आहे.
---------
कळक, दोऱ्या गायब
सातारा : कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी ग्राहक आणि दुकानदार यांच्यात सुरक्षित अंतर राखले जावे, यासाठी पायऱ्यांना कळक, दोऱ्या बांधल्या होत्या. मात्र दुसऱ्या लाटेत पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक पटीने कोरोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. तरीही दुकानदारांकडून फारशी काळजी घेतलेली दिसून येत नाही. पूर्वीचे कळक, दोऱ्याही गायब झाल्या आहेत. त्यामळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याचा धोका नाकारता येत नाही.
००००००००
कांद्याला मागणी वाढली
सातारा : जिल्ह्यात काही महिन्यांपूर्वी पन्नास, साठ रुपये किलो दराने कांद्याची विक्री केली जात होती. आता कांद्याचे दर नियंत्रणात आले असून, मोठा कांदा सरासरी वीस रुपये किलो दराने मिळत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने मसाला तिखट बनविण्यासाठी कांद्याला मागणी वाढत आहे. एक व्यक्ती चार-पाच किलो कांदा खरेदी करत असते.
----------
सेवारस्त्याची दुरवस्था
सातारा : सातारा जिल्ह्यातून गेलेल्या पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ता तयार केला आहे. या रस्त्यावरून ग्रामीण भागातील वाहनांची मोठी वर्दळ असते; मात्र या रस्त्याची मोठया प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. ते तातडीने मुजविण्याची मागणी केली जात आहे.