आदर्की : फलटण पश्चिम भागात जिल्हा परिषद व बांधकाम विभागाकडे असणाऱ्या रस्त्याचे खडीकरण, मुरुमीकरण, डांबरीकरण, खड्डे भरण्याचे कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत; पण कामे निकृष्ट दर्जाची करून अधिकारी, ठेकेदार डांबराऐवजी ऑईलमिश्रित डांबर टाकून चुना लावत असल्याने खड्डे पडत आहेत. त्यामुळे वाहनधारकांचे कंबरडे मोडत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
फलटण फलटण पश्चिम भागात जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने विविध रस्त्यांवर लाखो रुपयाची कामे संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जिल्हा परिषदेच्यावतीने मुळीकवाडी, सासवड फाटा, कापशी, बिबी, आदर्की खुर्द, हिंगणगाव तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सुरू असलेल्या हिंगणगाव-कापशी, आळजापूर फाटा-बिबी-वडगाव, बिबी-मुळीकवाडी-नांदल फाटा आधी रस्त्याच्या कामाचे खडीकरण, डांबरीकरण, खड्डे मुजवून कामे सुरू आहेत. डांबरी रस्त्यावरील खड्डे मुजवताना डांबर कमी अन् खडी जादा टाकली जात असल्याने एका आठवड्यात ‘जैसे थे’ परिस्थिती होत आहे. त्यामुळे वाहनधारकांचे कंबरडे मोडत आहे.
चौकट..
कामाची दर्जा निकृष्ट....
फलटण पश्चिम भागात अनेक रस्त्यांची कामे ठेकेदारामार्फत जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; पण निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्ते खड्ड्यात जातात.
०३आदर्की
फोटो : फलटण पश्चिम भागात रस्त्याची दुरावस्था झालेली असून रस्त्याच्या मध्यभागी खड्डे पडले आहेत.