गेल्या दोन दिवसापासून राज्यात विविध भागात गडगडाटी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक भागात नुकसान केले. फलटण तालुक्यातही विजांसह पाऊस झाला. फलटण येथील सरडे गावात एका ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज पडून एकाचा मृत्यू तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
फलटण येथील आयटीआयचे तीन विद्यार्थी ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवरुन जात होते. यावेळी अचानक विजांच्या कडकडाटसह पावसाला सुरूवात झाली. चालत्या ओला स्कूटरवर विज पडली आहे. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेली माहिती अशी, ११ मे रोजी रोजी सायंकाळी सरडे तालुका फलटण जिल्हा सातारा येथे वीज पडून मोटरसायकल वरील एकाचा मृत्यू व दोन जण जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींवर गिरीराज हॉस्पिटल बारामती येथे उपचार चालू आहेत व त्यांची प्रकृती स्थिर आहे. विक्रम विजय धायगुडे राहणार सरडे तालुका फलटण जिल्हा सातारा वय १७, प्रथमेश सुनील भिसे वायसेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर वय १७, मयत नामे ज्ञानेश्वर गहिनीनाथ ढोले वय १७ राहणार वंजारवाडी खर्डा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर. वरील तिन्ही विद्यार्थी आयटीआय शारदानगर येथे शिक्षण घेत होते.