तांबवे : गेली दोन दिवस पडत असलेल्या जोरदार पावसाने व कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कोयना नदीपात्रातील पाणी पातळी झपाट्याने वाढली. त्यामुळे गुरुवारी दुपारी तांबवे जुना कोसळलेला पुल पाण्याखाली गेला आहे.गेल्या आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महापूर आला. अनेक गावात पाणी घुसले. गावची अवस्था बेटासारखी झाली होती. गत चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने पुन्हा एकदा कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे.यामुळे धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. यात तांबवे येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा दोन दिवसापूर्वीच पाण्याखाली गेला आहे. गुरूवारी दुपारी तांबवे जुना कोसळला पुलही पाण्याखाली गेला आहे. गेल्या महिन्यात आलेल्या महापुरात आठ ते दहा दिवस पुलाला जलसमाधी मिळाली होती. यातच पुलाचे पिलियर कमकुवत होत पुल कोसळला त्याच पुलावरुन पाणी गेले आहे.नवीन पुराचे काम पुर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला झाल्याने तांबवे परिसरातील ग्रामस्थाचे हाल थांबले. जुन्या पुलावरून पाणी गेले तरी तांबवे गावाला नवीन पुल पर्याय आहे. परंतु गेली चार दिवस पडत असलेल्या पावसाने पुन्हा महापुर येतोय की काय अशा गावात चर्चा सुरु आहे. काही ग्रामस्थामध्ये घबराट निर्माण झाली आहे.
जोरदार पावसाने तांबवेतील जुना पूल पुन्हा पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 5:40 PM
गेली दोन दिवस पडत असलेल्या जोरदार पावसाने व कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कोयना नदीपात्रातील पाणी पातळी झपाट्याने वाढली. त्यामुळे गुरुवारी दुपारी तांबवे जुना कोसळलेला पुल पाण्याखाली गेला आहे.
ठळक मुद्देतांबवेतील जुना पूल पुन्हा पाण्याखालीकोयना नदीपात्रातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ