वाई : वाई नगरपालिकेच्या विशेष सभेत ५५ लाख ५५ हजार ९३६ रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला़ मात्र, मागील अर्थसंकल्पात मंजूर केलेली कामे अपूर्ण राहिल्याने व इतर अनेक त्रुटी दाखवित विरोधकांनी अर्थसंकल्पावर हरकती घेतल्या़ शहराच्या प्रारूप विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा घेण्यात यावी, अशी मागणी जनकल्याण आघाडीच्या सदस्यांनी यावेळी केली़ यावेळी कृष्णा घाट विकासाठी दीड कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली.नगराध्यक्ष भूषण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत मुख्याधिकारी आशा राऊत यांनी २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सभागृहासमोर मांडला. कार्यालय अधीक्षक राजन बागुल व नितीन नायकवडी यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती दिली़अर्थसंकल्पात प्रामुख्याने इमारत दुरुस्ती, बांधकाम ६५ लाख, नगररचना व जागांचे भूसंपादन ५५ लाख विशेष योजना ६५ लाख, प्रशासकीय इमारत ५० लाख, शॉपिंग सेंटर बांधकाम दोन कोटी, आयएचएसडीपी ७५ लाख, रस्ते दुरुस्ती व डांबरीकरण एक कोटी २५ लाख, स्मशानभूमी बांधकाम व दुरुस्ती एक कोटी तर आयलँड विकसित करण्यासाठी ८० लाखांची तरतूद करण्यात आली आहे़ महसुली खर्चात ओला, सुका कचरा गोळा करणे २३ लाख, कचऱ्याचे ढीग लेव्हलिंग साडेसहा लाख, फॉगिंग मशीन तीन लाख, सॉप्टवेअर स्पोर्ट, मुद्रण व लेखन सामग्री, छपाई १९ लाख, शालेय खर्च ११ लाख, वृक्षारोपण ४ लाख, महिला व बाल कल्याण समिती ७ लाख ५० हजार याशिवाय दुर्बल घटक कल्याण योजना, महिला व बालक विकास यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे़.यावेळी झालेल्या चर्चेत सचिन फरांदे, अनिल सावंत, दत्तात्रय ऊर्फ बुवा खरात, डॉ. अमर जमदाडे, धनंजय मोरे, महेंद्र धनवे, कैलास जमदाडे यांनी काही दुरुस्त्या सुचविल्या़ (प्रतिनिधी)मागील अर्थसंकल्पातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर भर दिला जाईल़ अर्थसंकल्पात अनेक लोकोपयोगी तरतुदी केल्या आहेत. कृष्णा नदी स्वच्छतेसाठी तरतूद केली असून, कृष्णा नदीसहित इतर विविध विकासकामांवर लक्ष दिले जाईल.-भूषण गायकवाड, नगराध्यक्षबजेट मध्ये लोकवर्गणीतून जमा होणाऱ्या निधीमधून शासकीय योजना राबविण्यासाठी लागणाऱ्या राखीव निधीची तरतूद नाही़ पालिकेने अनेक ठिकाणी आरक्षणे टाकली असून, जागा संपादनासाठी ३६५ कोटींची आवश्यकता असताना तरतूद केली नाही. अशा अनेक त्रुटी अर्थसंकल्पात आहे़ - सचिन फरांदे, नगरसेवक, जनकल्याण आघाडीसभेतील महत्वाचे निर्णयपाणघाट व कृष्णा नदी घाट विकासासाठी दीड कोटीउद्यान विकास एक कोटीपर्यटन विकास एक कोटीनागरिकांना आरोग्य, साफसफाई व इतर सेवा पुरविण्यासाठी मालमत्तेवर प्रतिवर्षी साठ रुपये करवाहनतळाची व्यवस्था पाहण्यासाठी खासगी ठेकादोन वर्षांतून एकदा पालिकेमार्फत सेफ्टी टॅँकची मोफत सफाई
वाईच्या कृष्णा घाट विकासासाठी दीड कोटी
By admin | Published: March 03, 2015 10:03 PM