वाई : बारा महिने, चोवीस तास पर्यटकांच्या वर्दळीने फुललेला पसरणी घाट सध्या निसर्ग अन मानवाचा संघर्ष पाहण्यातच जणू दंग झाला आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर रस्त्यालगतचे उध्वस्त कठडे बांधण्यासाठी एकीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने कंबर कसली असली तरी दुसरीकडे लगेच नवे भगदाड निर्माण करण्यात निसर्गाची स्पर्धा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.वाई-पाचगणी रस्त्यावर घाटात १६ नंबरजवळ मुख्य रस्त्याला पडलेल्या भगदाडाची सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे. वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. त्यातच पसरणी घाटात धुक्यासह पाऊस पडत असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे अवघड झाले होते. आठ-ते दहा फुटांचा रस्ता पावसात वाहून गेला होता. वाईचे बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने प्रवशांमध्ये समाधान आहे. पाच ते दहा फूट रस्ता खचला होता. बुवासाहेब मंदिराच्या शेजारीही मोठी दरड कोसळण्याची शक्यता असल्याने बांधकाम विभागाने हे काम हाती घेतले. पाण्याने दगडी रिकाम्या होऊन दरड कोसळण्याच्या बेतात होते. पसरणी घाटातील हे मंदिर या रस्त्यावरून जाणाºया वाहनचालक व लोकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराच्या बाजूने पाण्याचे लोट लागले होते. वाईतून पाचगणीला जाण्यासाठी हाच एकमेव रस्ता असल्याने तसेच या घाटात वाहतूक नेहमीच प्रचंड प्रमाणात असते. मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला कसरत करतच काम करावे लागत आहे. |
एकीकडे दुरुस्ती तर दुसरीकडे लगेच नवीन भगदाड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 6:00 PM
वाई : बारा महिने, चोवीस तास पर्यटकांच्या वर्दळीने फुललेला पसरणी घाट सध्या निसर्ग अन मानवाचा संघर्ष पाहण्यातच जणू दंग झाला आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर रस्त्यालगतचे उध्वस्त कठडे बांधण्यासाठी एकीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने कंबर कसली असली तरी दुसरीकडे लगेच नवे भगदाड निर्माण करण्यात निसर्गाची स्पर्धा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. वाई-पाचगणी रस्त्यावर घाटात १६ नंबरजवळ मुख्य रस्त्याला पडलेल्या भगदाडाची सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे.
ठळक मुद्देबांधकाम विभागाची कसरत पसरणी घाटात निसर्गासोबत आगळीच स्पर्धा