शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
“महाराष्ट्राच्या परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
3
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
4
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
5
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
6
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
7
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
8
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
9
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
10
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
11
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
12
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
13
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
14
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
15
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
16
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
17
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
18
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
19
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
20
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!

उंब्रज जवळील अपघातात एक ठार

By admin | Published: February 02, 2016 1:05 AM

उसाच्या ट्रॉलीला धडक : हवेची पिशवी उघडल्याने चालक बचावला

उंब्रज : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील पेरले हद्दीत उसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला कारने पाठीमागून धडक दिली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एकजण ठार असून, चालक जखमी आहे. सचिन विलास नवले असे ठार झालेल्याचे नाव आहे. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऊस घेऊन ट्रॅक्टर-ट्रॉली (एमएच ११ यू ५९१४) हा सोमवारी पहाटे एकच्या सुमारास काशीळहून सह्याद्री कारखान्याकडे निघाला होता. तो पेरले हद्दीत आला असता ट्रॉलीला कार (एमएच ९ बीएस ८००२) ने पाठीमागून धडक दिली. यामध्ये चालकाशेजारी बसलेले सचिन विलास नवले (वय ३०, रा. टेंबलाई नाका, कोल्हापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर हवेची पिशवी उघडल्याने चालक प्रवीण नामदेव चव्हाण (रा. सरवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) हे जखमी झाले. अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक प्रवीण चव्हाण यांच्यावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार हेमंत मुळीक तपास करत आहेत. (प्रतिनिधी) गाडीचा चक्काचूर हा अपघात मध्यरात्री एकच्या सुमारास झाला. माहिती मिळाल्यानंतर पोलीसही तातडीने घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, कार ट्रॉलीखाली आत लांबपर्यंत शिरली होती. त्यामुळे कार बाहेर काढणे अवघड जात होते. क्रेन बोलावून गाडी बाहेर काढली. यामध्ये गाडीचा चुक्काचूर झाला आहे. तत्पूर्वी जखमींना गाडीतून बाहेर काढून दवाखान्यात पाठविण्यात आले. तपासल्यानंतर डॉक्टरांनी सचिन नवले यांना मृत घोषित केले. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून, हवेच्या पिशवीमुळे चालक वाचला असल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती.