शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

कार-दुचाकीच्या धडकेत एकजण ठार, महिला जखमी; पुसेसावळी-कडेपूर मार्गावर झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 5:20 PM

पुसेसावळी: दुचाकी व कारच्या धडकेत एकजण जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी झाली. प्रकाश पांडुरंग वाघमोडे (वय ४५, ...

पुसेसावळी: दुचाकी व कारच्या धडकेत एकजण जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी झाली. प्रकाश पांडुरंग वाघमोडे (वय ४५, रा.देवकरवाडी सातारा) असे मृताचे नाव आहे. तर प्रकाश यांची पत्नी छाया वाघमोडे (३८) या गंभीर जखमी झाल्या. खटाव तालुक्यातील पुसेसावळी-कडेपूर रस्त्यावरील गोरेगाव वांगी येथील (माने वस्ती) येथे हा अपघात झाला. याबाबत माहिती अशी की, प्रकाश वाघमोडे पत्नीसह आपल्या दुचाकी क्रमांक (एम.एच ११ बी.एन.१६३७) वरून कुपवाड मिरज बाजुकडून कडेपुर मार्गे साताऱ्याकडे निघाले होते. गोरेगाव वांगी (मानेवस्ती) येथे आले असता समोरुन येणाऱ्या भरधाव कारने (एम.एच - १० सी.ए.०८०४) वाघमोडे यांच्या दुचाकीस धडक दिली. यात वाघमोडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली. याप्रकरणी दादासो विष्णू घागरे यांनी औंध पोलिस स्टेशनला उशीरा तक्रार दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू