लोकमत न्यूज नेटवर्कखंडाळा/ लोणंद : वाई तालुक्यातील मांढरगडावर रविवारी सायंकाळी ढगफुटी झाली. काही काळात झालेल्या मुसळधार पावसामुळे खंडाळा तालुक्यात अनेक गावांतील ओढ्यांना पूर आला. लोणंदमध्ये आलेल्या पुरात तिघेजण वाहून गेले. त्यातील मायलेक वाचले असून मामा बेपत्ता बेपत्ता झाला आहे.लोणंद परिसरास रविवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दोन तास मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले. या मुसळधार पावसामुळे लोणंद शहरातून वाहणाºया खेमवती नदीस पूर आल्याने वाहतूक बंद झाली होती.लोणंद शहरासह परिसरास रविवारी पाचनंतर दोन तास मुसळधार पावसाने झोडपले असून, या मुसळधार पावसामुळे लोणंद शहरातून वाहणाºया या खेमवती नदीस पूर आल्याने लोणंद-शिरवळ रोडला खेमवती नदीवर असणारा पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद झाली.लोणंद, शिरवळ रस्त्याला लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पाच वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात होऊन लोणंद शहर व परिसरास दोन तास झोडपून काढले. लोणंद फलटण रस्त्याला सरहद्दीच्या पुलावरून पाणी गेल्याने फलटण रस्त्यावरील वाहतूक दोन तास बंद होती.लोणंद बाजार तळावर उभारलेल्या फटाका स्टॉलधारकांंचे देखील या पावसामुळे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाचा जोर जास्त असल्याने ओढ्यांना पूर आला आहे. त्यातच वातावरण ढगाळ होऊन अंधार पडल्याने वाहनचालकांना तर वाहन चालविताना पुढचे काहीच दिसत नव्हते.या पावसाने लोणंद शहरात सर्वत्र पाणीच पाणी केले असून, अनेक वर्षांनंतर खेमवती नदीस पूर आल्याने हे पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच खेमावती नदीला आलेल्या अचानक पाण्यात तीनजण वाहून गेले. परंतु दोघांना वाचविण्यात नागरिकांना यश आले.घटनेची माहिती समजल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थ शोध घेत होते.
लोणंदच्या पुरात एक बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 10:49 PM