शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

Satara: एनकुळ येथे गॅस सिलिंडरचा स्फोट, एकजण जखमी; ऐन दिवाळीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक

By जगदीश कोष्टी | Published: November 01, 2024 5:46 PM

कातरखटाव : खटाव तालुक्यातील एनकुळ येथे ढोले वस्तीवरील अर्जुन पांडुरंग ढोले यांच्या घरात गॅस सिलिंडर सुरू केला असता अचानक रेग्युलेटरमधून ...

कातरखटाव : खटाव तालुक्यातील एनकुळ येथे ढोले वस्तीवरील अर्जुन पांडुरंग ढोले यांच्या घरात गॅस सिलिंडर सुरू केला असता अचानक रेग्युलेटरमधून जाळ झाला, अशातच दहा मिनिटांत सिलिंडरचा स्फोट झाल्याने ऐन दिवाळीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.गुरुवारी रात्री ढोले यांनी नवीन आणलेली सिलिंडरची टाकी जोडली आणि लायटरने शेगडी पेटवल्यानंतर टाकीच्या रेग्युलेटरजवळ जाळ झाला. सावधानता बाळगल्याने पती-पत्नींनी भीतीपोटी घराबाहेर पळ काढला. नंतर दहा मिनिटांतच टाकीचा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज झाल्याने लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझविवण्याचा प्रयत्न केला. ऐन दिवाळीत ही दुर्घटना घडल्याने या कुटुंबावर चांगलेच आर्थिक संकट ओढले आहे. गॅसच्या स्फोटाने कौलाच्या ठिकऱ्या उडाल्या. जुन्या काळातील दगडी भिंतीला तडे गेले.या घरातील कुटुंबाने सावधानता बाळगून घरातून पळ काढल्याने जीवितहानी टळली आहे. या घटनेत दोन लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनास्थळी गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी भेट दिली असून वडूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणेश शिरकुळे आणि शिवाजी खाडे तपास करीत आहेत.

डाव्या डोळ्याला इजा..सिलिंडरचा स्फोट झाल्याने सर्व कौलाच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या असून त्यातील एक तुकडा उडून घरमालक अर्जुन ढोले यांच्या डाव्या डोळ्याच्या बाजूला लागल्याने जखमी झाले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग